Realme 8 Pro कंपनीचा पहिला १०८ मेगापिक्सेल कॅमेरा असलेला स्मार्टफोन; पाहा फर्स्ट लूक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2021 06:26 PM2021-03-02T18:26:27+5:302021-03-02T18:30:40+5:30

Realme 8 Pro : लवकरच हा स्मार्टफोन होणार लाँच

Realme details 108MP camera ahead of Realme 8 Pro launch used new samsung sensor available in xiaomi | Realme 8 Pro कंपनीचा पहिला १०८ मेगापिक्सेल कॅमेरा असलेला स्मार्टफोन; पाहा फर्स्ट लूक

Realme 8 Pro कंपनीचा पहिला १०८ मेगापिक्सेल कॅमेरा असलेला स्मार्टफोन; पाहा फर्स्ट लूक

Next
ठळक मुद्देया स्मार्टफोनमध्ये ऑल न्यू सेन्स झूम टेक्नॉलॉजीची सुविधाही असेल.स्मार्टफोनमध्ये 30fps चा टाईम लॅप्स व्हिडीओचा सपोर्टही मिळेल.

स्मार्टफोन मेकर कंपनी Realme नं नुकतीच Realme 8 Pro बद्दल मोठी घोषणा केली आहे. Realme 8 Pro हा कंपनीचा पहिला स्मार्टफोन असेल ज्यामध्ये 108 मेगापिक्सेल कॅमेरा लावण्यात येईल अशी माहिती कंपनीनं Realme Camera Innovation Event 2021 मध्ये दिली. हा कॅमेरा सॅमसंग HM2 या प्रायमरी कॅमेरा सेन्सरसोबत येणार आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात सादर करण्यात आलेला हा नवा कॅमेरा सेन्सर Xiaomi च्या Mi 10i चा हिस्साही आहे. 

108 मेगापिक्सेल कॅमेऱ्या व्यतिरिक्त Realme 8 Pro मध्ये ऑल न्यू सेन्स झूम टेक्नॉलॉजीची सुविधाही असणार आहे. यामध्ये 3x झूम करता येईल. तसंच हा सेन्सर जुन्या ऑप्टीकल झूम लेन्सपेक्षा अधिक चांगला असा दावा कंपनीनं केला आहे. तसंच Realme 8 सीरिजमध्ये स्टाररी मोडसोबत एक अपडेट येणार आहे. तसंचयानंतर टाईम लॅप्स व्हिडीओ तयार करण्याचाही ऑप्शन मिळेल. 
 


याव्यतिरिक्त या स्मार्टफोनमध्ये नियो पोट्रेट, डायनॅमिक बोकेह पोट्रेट आणि AI कलर पोट्रेटचा सपोर्ट दिला आहे. या स्मार्टफोनची इमेज प्रोसेसिंगही जलद असणार असल्याचं सांगण्यात येत आहे. Realme 8 Pro चा कॅमेरा 12 मेगापिक्सेलचे ८ फोटो घेऊन तो एकत्र जोडेल. यामुळे फोटोमध्ये उत्तम क्लॅरिटी मिळेल. तसंच फोनमध्ये मवा Starry टाईम लॅप्स व्हिडीओ मोड देण्यात आला आहे. यामध्ये 4 सेकंदात 15 फोटो एकत्र करता येणार असल्याचंही कंपनीनं म्हटलं आहे. याव्यतिरिक्त यात 30fps चा टाईम लॅप्स व्हिडीओचा सपोर्टही मिळेल.
 

Web Title: Realme details 108MP camera ahead of Realme 8 Pro launch used new samsung sensor available in xiaomi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.