महागाईचा डबल वार! रिचार्जनंतर आता स्मार्टफोन देखील महागले; Realme नं दिला झटका 

By सिद्धेश जाधव | Published: December 1, 2021 05:05 PM2021-12-01T17:05:50+5:302021-12-01T17:07:09+5:30

Realme C21 2021 Price In India: Realme C11 2021 चे दोन व्हेरिएंट भारतात उपलब्ध आहेत. जूनमध्ये लाँच झालेल्या या फोनच्या दोन्ही व्हेरिएंटची किंमत कंपनीनं वाढवली आहे.

Realme c11 2021 budget phone price hike in india  | महागाईचा डबल वार! रिचार्जनंतर आता स्मार्टफोन देखील महागले; Realme नं दिला झटका 

महागाईचा डबल वार! रिचार्जनंतर आता स्मार्टफोन देखील महागले; Realme नं दिला झटका 

Next

Realme C21 2021 Price In India: Realme नं आपल्या लोकप्रिय स्मार्टफोनची किंमत वाढवली आहे. आजपासून मोबाईल जियोचे रिचार्ज प्लॅन महागणार आहेत, अ‍ॅमेझॉननं आपल्या सब्स्क्रिप्शनची किंमत वाढवली आहे आणि डीटीएच रिचार्ज देखील महागणार आहेत. आता रियलमीनं Realme C11 2021 या बजेटमधील स्मार्टफोनची किंमत वाढवली आहे, अशी माहिती 91मोबाईल्सनं इतरांच्या हवाल्याने दिली आहे.  

Realme C11 (2021) ची नवीन किंमत 

Realme C11 2021 चे दोन व्हेरिएंट भारतात उपलब्ध आहेत. जूनमध्ये लाँच झालेल्या या फोनच्या दोन्ही व्हेरिएंटची किंमत कंपनीनं वाढवली आहे. या डिवाइसचा 2जीबी रॅम आणि 32जीबी स्टोरेज व्हेरिएंट 7,300 रुपयांच्या ऐवजी 7,500 रुपयांमध्ये विकत घ्यावा लागेल. तर 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज व्हेरिएंट 200 रुपयांच्या दरवाढीनंतर 9,000 रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. हा बदल ऑफलाईन विक्रीसाठी आहे कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर हा फोन अजूनही जुन्या किंमतीत उपलब्ध आहे.  

Realme C11 (2021) चे स्पेसिफिकेशन्स

Realme C11 (2021) मध्ये 6.5 इंचाचा एचडी+ ड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 1600x720 पिक्सल इतके आहे. या स्मार्टफोनमधील ऑक्टकोर प्रोसेसरचे नाव मात्र कंपनीने सांगितले नाही. 2GB रॅम आणि 32GB स्टोरेजसह येणार स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड 11 आधारित रियलमी यूआय गो एडिशन देण्यात आले आहे. या फोनची स्टोरेज मायक्रो एसडी कार्डने वाढवता येईल.   

फोटोग्राफीसाठी Realme C11 (2021) मध्ये 8 मेगापिक्सलचा एक रियर कॅमेरा देण्यात आला आहे. हा कॅमेरा 4x डिजिटल झूमला सपोर्ट करतो. सेल्फी आणि व्हिडियो कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Realme C11 (2021) मध्ये पावर बॅकअपसाठी 5000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. या बॅटरीच्या मदतीने इतर फोन्स देखील चार्ज करता येतात कारण यात रिवर्स चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे.   

Web Title: Realme c11 2021 budget phone price hike in india 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.