Snapdragon 8 Gen 1: क्वॉलकॉमच्या सर्वात वेगवान स्मार्टफोन प्रोसेसरची घोषणा; पाहा कोणत्या कंपन्या करणार याचा वापर  

By सिद्धेश जाधव | Published: December 1, 2021 12:46 PM2021-12-01T12:46:32+5:302021-12-01T12:47:11+5:30

Qualcomm Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर लाँच झाला आहे. हा कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात वेगवान प्रोसेसर आहे, असं कंपनीनं सांगितलं आहे.  

Qualcomm snapdragon 8 gen 1 soc launch will power next gen flagship android smartphones  | Snapdragon 8 Gen 1: क्वॉलकॉमच्या सर्वात वेगवान स्मार्टफोन प्रोसेसरची घोषणा; पाहा कोणत्या कंपन्या करणार याचा वापर  

Snapdragon 8 Gen 1: क्वॉलकॉमच्या सर्वात वेगवान स्मार्टफोन प्रोसेसरची घोषणा; पाहा कोणत्या कंपन्या करणार याचा वापर  

Next

Qualcomm नं आपल्या नव्या प्रोसेसरची घोषणा केली आहे, हा फ्लॅगशिप प्रोसेसर आहे. Snapdragon Tech Summit मधून नवीन चिपसेट Snapdragon 8 Gen 1 ची घोषणा कंपनीनं केली आहे. हा प्रोसेसर स्नॅपड्रॅगन 888 ची जागा घेईल. लाँच पूर्वी हा प्रोसेसर स्नॅपड्रॅगन 898 नावानं ओळखला जात होता, परंतु कंपनीनं याचं नाव Snapdragon 8 Gen 1 असं ठेवलं आहे.  

Snapdragon 8 Gen 1 ची वैशिष्ट्ये  

क्वालकॉमचा नवा प्रोसेसर 4nm प्रोसेसवर बनवण्यात आला आहे. याआधीच स्नॅपड्रॅगन 888 5nm प्रोसेसवर तयार करण्यात आला होता. त्यामुळे नव्या प्रोसेसरचा वेग 20 टक्क्यांनी वाढला आहे. हा क्वॉलकॉमचा Armv9 आर्टिकेटसह येणारा पहिला प्रोसेसर आहे. कंपनीनं यावेळी 5G कनेक्टिविटी, कॅमेरा सेन्सर, एआय , गेमिंग, ऑडियो आणि सिक्योरिटी या सहा बाबतींवर जास्त भर दिला आहे.  

Snapdragon 8 Gen 1 जुन्या प्रोसेसरच्या तुलनेत 30 टक्के जास्त पॉवर इफिशिएंट आहे, त्यामुळं बॅटरीचा वापर कमी होईल. यातील नवीन Adreno GPU 30 टक्के जास्त वेगानं ग्राफिक्स रेंडरिंग करतो आणि 25 टक्के पॉवर इफिशिएंट आहे. प्रोसेसरमध्ये 18-bit ISP ही नवीन ईमेज सिस्टम देण्यात आली आहे, जी डायनॅमिक रेंज, कलर आणि स्पीडसह येते. यात 8K HDR व्हिडीओ सपोर्टसह नवीन Bokeh इंजिन देण्यात आला आहे, म्हणजे आता व्हिडीओ देखील पोर्टरेट मोडमध्ये रेकॉर्ड करता येतील. कनेक्टिविटीसाठी यात Snapdragon X65 या 4th gen 5G मॉडेमचा वापर करण्यात आला आहे. त्याचबरोबर Wi-Fi 6 आणि Wi-Fi 6E, ब्लूटूथ LE ऑडियो आणि स्नॅपड्रॅगन साउंड टेक्नॉलॉजी सपोर्ट मिळतो. 

Snapdragon 8 Gen 1 सह येणारे फोन 

यावर्षीच्या अखेरपर्यंत Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर असलेला पहिला फोन बाजारात येईल, असं खुद्द क्वॉलकॉमनं सांगितलं आहे. यात शाओमी आणि मोटोरोला या कंपन्यांची नावे बातम्यांमधून समोर आली आहेत. तसेच Black Shark, Honor, iQOO, Nubia, OnePlus, OPPO, Realme, Redmi, SHARP, Sony, Vivo आणि ZTE देखील पुढील वर्षी आपले फ्लॅगशिप फोन नव्या प्रोसेसरसह सादर करू शकतात.  

Web Title: Qualcomm snapdragon 8 gen 1 soc launch will power next gen flagship android smartphones 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.