pubg offers in tweet to watch live streaming of playground battle playoff and win oppo f9 pro for free | पबजी न खेळताही मोफत मिळवा 21,990 रुपयांचा Oppo F9 Pro, कंपनीची भन्नाट ऑफर
पबजी न खेळताही मोफत मिळवा 21,990 रुपयांचा Oppo F9 Pro, कंपनीची भन्नाट ऑफर

ठळक मुद्दे पबजी गेम खेळल्यास आपल्याला 21,990 रुपयांचा Oppo F9 Pro स्मार्टफोन मोफत मिळणार आहे. पबजी मोबाइल इंडिया सीरिज 2019च्या गेममधल्या क्वॉलिफायर राउंडमधले निकाल जाहीर करण्यात आले आहेत.प्लेऑफ राऊंड 10 फेब्रुवारीपासून 24 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. प्लेऑफ राउंडचं लाइव्ह स्ट्रीमिंग पाहून आपण Oppo F9 Pro हा स्मार्टफोन जिंकू शकता

नवी दिल्ली-  मोबाईलवर इंटरनेटच्या माध्यमातून गेम खेळणं फक्त रिकामा वेळ घालवण्याचं एक साधन समजलं जातं. परंतु आता व्यवसायासाठीही या गेमचा वापर केला जातोय. भारतातही पबजी हा गेम दिवसेंदिवस लोकप्रिय होत चालला आहे. PUBGनं ग्राहकांसाठीही एक खूशखबर दिली आहे. पबजी गेम खेळल्यास आपल्याला 21,990 रुपयांचा Oppo F9 Pro स्मार्टफोन मोफत मिळणार आहे. पबजी मोबाइल इंडिया सीरिज 2019च्या गेममधल्या क्वॉलिफायर राउंडमधले निकाल जाहीर करण्यात आले आहेत. ज्यात 2 हजार लोकांचा समावेश आहे. प्लेऑफ राऊंड 10 फेब्रुवारीपासून 24 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. प्लेऑफ राउंडचं लाइव्ह स्ट्रीमिंग पाहून आपण Oppo F9 Pro हा स्मार्टफोन जिंकू शकता, असं ट्विट कंपनीनं केलं आहे.

पबजीनं ट्विट करून सांगितलं आहे. पबजीच्या प्लेऑफ राऊंडची सुरुवात 10 फेब्रुवारीपासून होणार असून, 10 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारीपर्यंत  पबजीच्या प्लेऑफ राऊंडचं लाइव्ह स्ट्रीमिंग पाहणाऱ्याला Oppo F9 Pro स्मार्टफोन जिंकता येणार आहे. ज्याची किंमत भारतीय बाजारानुसार 21,999 रुपयांच्या घरात आहे. पबजी गेमच्या क्वॉलिफायर राउंडची सुरुवात 21 जानेवारीला झाली होती आणि 27 जानेवारीला संपली होती.


युजर्स यांची माहिती https://pubgmobile.in/indiaseries/Pubg/Results वर पाहू शकतात. पबजीची भारतीय स्पर्धा तीन भागांत विभागण्यात आली आहे. खेळाडूला पहिल्यांदा गेम क्वॉलिफाय करावा लागणार आहे. त्यानंतर ऑनलाइन प्लेऑफ आणि त्यानंतर ग्रेड फायनल राऊंडमधून जावं लागणार आहे. ज्यात ग्राहक प्लेऑफ राऊंडचं लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकणार आहेत.

तर गेल्या काही दिवसांपूर्वी पबजी खेळून 27 वर्षांच्या निंजानंही 70 कोटी कमावल्याची माहिती समोर आली होती. 27 वर्षांचा निंजा नावाच्या एका व्यक्तीनं पबजी गेम खेळून 2018मध्ये 10 मिलियन डॉलर(जवळपास 70 कोटी रुपये) कमावले होते. यासाठी त्यानं YouTube आणि Twitchचा आधार घेतला होता. निंजा हा गेमिंग जगतातला नावाजलेला चेहरा आहे. त्याचं पूर्ण नाव टायलर ब्लेविन्स आणि तो निंजा हे युजरनेम वापरतो. वर्ष 2018मध्ये Twitchवर स्ट्रीमरमध्ये निंजा नंबर राहिला होता.

Web Title: pubg offers in tweet to watch live streaming of playground battle playoff and win oppo f9 pro for free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.