pubg mobie indian rival faug is up for pre registration on google play | FAUG गेमसाठी प्री रजिस्ट्रेशन सुरू, अधिक माहितीसाठी जाणून घ्या...

FAUG गेमसाठी प्री रजिस्ट्रेशन सुरू, अधिक माहितीसाठी जाणून घ्या...

ठळक मुद्देFauG गुगल प्ले स्टोअरवर प्री रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध आहे. तसेच, यामध्ये काही गेम प्ले फोटो आहेत, ज्यावरून या गेमची थीम काय असणार आहे, याची कल्पना येत आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने भारतात PUBG Mobile गेमिंग अॅपवर बंदी घातल्यानंतर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने FAUG (Fearless and United Guards) नावाच्या गेमचा टीझर शेअर केला. हा गेम nCore गेमिंगने डेव्हलप केला आहे. अद्याप हा गेम लाँच झाला नाही आणि यातच आता PUBG MOBILE INDIAच्या कमबॅकच्या बातम्या येत आहेत.

दरम्यान, FauG साठी गुगल प्ले स्टोअरवर प्री रजिस्ट्रेशन सुरु झाले आहे. याआधी गुगल प्ले स्टोअरवरून नावाची अनेक बनावट अॅप्स देखील हटवण्यात आली आहेत. FauG गुगल प्ले स्टोअरवर प्री रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध आहे. तसेच, यामध्ये काही गेम प्ले फोटो आहेत, ज्यावरून या गेमची थीम काय असणार आहे, याची कल्पना येत आहे. याआधी या गेमचा एक व्हिडिओ ट्रेलरही आला होता ज्यामध्ये भारत-चीन सीमेवर चिनी सैनिकांसोबत झालेला तणाव दाखविण्यात आल्याचे म्हटले जात होते.

गुगल प्ले स्टोअरवर अपलोड केलेल्या अनेक फोटोंमध्ये सैनिक एकमेकांशी लढताना दिसत आहेत. डोंगराळ प्रदेश आहे आणि लढाई हातांनी होत असल्याचे दिसत आहे. यासाठी सैनिकांच्या हातात शस्त्रेही आहेत. या गेममध्ये अनेक लेव्हल आणि टास्क असतील आणि हा खेळ भारताच्या उत्तर सीमेवर गेम प्ले होईल. या गेमच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिहिले आहे की,  FauGकमांडो धोकादायक सीमावर्ती भागात गस्त घालत आहेत आणि ते भारताच्या शत्रूंबरोबर युद्ध करतील.

प्री रजिस्टर कसे करावे?
प्री रजिस्टर करणे सोपे आहे. कंपनीने म्हटले आहे की,  गेम खेळण्यासाठी आधी तुम्हाला प्री रजिस्टर करावे लागेल. यासाठी तुम्ही गुगल प्ले स्टोअरमध्ये FauG लिहून शोधू शकता. येथे तुम्हाला FauGसाठी प्री रजिस्ट्रेशनचा ऑप्शन दिसेल. याठिकाणी तुम्हाला टॅप करावा लागेल. यानंतर तुमची प्री रजिस्ट्रेशन केली जाईल. nCore कडून अद्याप गेम कधी लाँच करण्यात येईल आणि कधी आयओएसवर येईल, हे सांगण्यात आले नाही. कारण सध्या या गेमचे प्री रजिस्ट्रेशन अँड्रॉइडच्या गुगल प्ले स्टोअरवर केले जात आहे.
 

Web Title: pubg mobie indian rival faug is up for pre registration on google play

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.