लाँचपूर्वीच पाहा फ्लॅगशिप स्मार्टफोन Oppo Find X3 Pro चा जबरदस्त लूक; जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 07:00 PM2021-02-02T19:00:30+5:302021-02-02T19:02:52+5:30

12 GB RAM, 256 GB स्टोरेज, पाहा आणखी काय आहेत जबरदस्त फीचर्स

OPPO Find X3 Pro key specifications leaked online ahead of expected launch in March | लाँचपूर्वीच पाहा फ्लॅगशिप स्मार्टफोन Oppo Find X3 Pro चा जबरदस्त लूक; जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स

लाँचपूर्वीच पाहा फ्लॅगशिप स्मार्टफोन Oppo Find X3 Pro चा जबरदस्त लूक; जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स

Next
ठळक मुद्देOppo Find X3 Pro मार्च महिन्यात होणार लाँचयामध्ये पॉवरफुल Qualcomm Snapdragon 888 प्रोसेसरही देण्यात आला आहे

काही दिवसांपूर्वीच Oppo नं आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन Oppo Reno 5 Pro 5G लाँच केला होता. या फोनबाबत युझर्समध्ये मोठा उत्साह दिसून आला होता. आता मार्च महिन्यात Oppo आपला आणखी एक फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. याचा लूक आणि स्पेसिफिकेशन्सही जबरदस्त आहेत. लाँचपूर्वीच याचे सर्व स्पेसिफिकेशन्स जारी करण्यात आल्यानं ग्राहकांमध्येही उत्साह दिसून येत आहे. Oppo Find X3 Pro चा लूक आणि स्पेसिफिकेशन्स जबरदस्त असून ओप्पो पुन्हा एकदा प्रिमिअम सेगमेंटमध्ये आपलं नाव कोरणार असल्याचं दिसून येत आहे. 

Oppo Find X3 Pro च्या स्पेसिफिकेशन्स बद्दल सांगायचं झालं तर यात 6.7 इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. तसंच त्याचं रिझॉल्युशन 1440*3216 पिक्सेल आहे. या स्मार्टफोनचा रिफ्रेश रेच 120Hz पर्यंत आहे. Oppo Find X3 Pro हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 888 प्रोसेसर सोबत 12 GB RAM आणि 256 GB स्टोरेजसह लाँच केला जाईल. तसंच या स्मार्टफोनमध्ये 4500 mAh ची ड्युअल सेल बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 65W Super VOOC 2.0 वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 30W VOOC Air wireless flash चार्जिंग सपोर्टसह येतो.
 


कॅमेराही भन्नाट

ColorOS 11.2 वर बेस्ड असलेल्या Oppo Find X3 Pro च्या कॅमेऱ्याबद्दल सांगायचं झालं तर यात क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आलं आहे. तसंच यात 50 मेगापिक्सेलचा  Sony IMX766 सेन्सरही आहे. यात अल्डावाईड लेन्सदेखील देण्यात आली असून 13 मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर 2x optical zoom सह येतो. याव्यतिरिक्त यात 3MP ची मायक्रो लेन्स देण्यात आली असून ती  25x zoom सोबत येतो. ओप्पोचा या स्मार्टफोनमध्ये OFILM लेन्स देण्यात आली असून ती सुपरझूम फीचर्ससोबत येते. 

Web Title: OPPO Find X3 Pro key specifications leaked online ahead of expected launch in March

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.