Oppo च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; कंपनीने दोन सीरिजच्या स्मार्टफोन्सच्या किंमती वाढवल्या 

By सिद्धेश जाधव | Published: September 21, 2021 01:01 PM2021-09-21T13:01:10+5:302021-09-21T13:01:24+5:30

OPPO A54 and OPPO F19 Price In India: OPPO ने देखील आपल्या बजेट सेगमेंटमधील दोन स्मार्टफोन्सच्या किंमतीत 1000 रुपयांपर्यंतची वाढ केली आहे. यात OPPO A54 आणि OPPO F19 चा समावेश आहे.

OPPO A54 and OPPO F19 Price Increased in India OPPO A16 Launched  | Oppo च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; कंपनीने दोन सीरिजच्या स्मार्टफोन्सच्या किंमती वाढवल्या 

Oppo च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; कंपनीने दोन सीरिजच्या स्मार्टफोन्सच्या किंमती वाढवल्या 

Next

गेले काही दिवस भारतीय स्मार्टफोन ग्राहकांसाठी महागडे ठरले आहेत. सर्वच स्मार्टफोन निर्मात्या कंपन्यांनी आपल्या बजेट आणि मिडरेंज फोन्सच्या किंमती वाढवल्या आहेत. OPPO ने देखील आपल्या बजेट सेगमेंटमधील दोन स्मार्टफोन्सच्या किंमतीत 1000 रुपयांपर्यंतची वाढ केली आहे. यात OPPO A54 आणि OPPO F19 चा समावेश आहे, जे आता नवीन किंमतीसह खरेदीसाठी उपलब्ध झाले आहेत.  

OPPO A54 ची नवीन किंमत  

कंपनीने ओपो ए54 ची किंमत याआधी देखील 500 रुपयांनी वाढवली होती. भारतात हा फोन 13,490 रुपयांमध्ये लाँच झाला होता. त्यानंतर 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजसह येणाऱ्या या फोनची किंमत 13,990 रुपये करण्यात आली होती. आता हा फोन 1,000 रुपयांनी महागला आहे. OPPO A54 स्मार्टफोन सध्या भारतात 14,990 रुपयांमध्ये विकला जात आहे.  

OPPO F19 ची नवीन किंमत 

ओपो एफ19 च्या किंमतीत देखील 1000 रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेजसह येणार हा फोन याआधी 18,990 रुपयांमध्ये खरेदी करता येत होता. परंतु आता OPPO F19 विकत घेण्यासाठी 19,990 रुपये मोजावे लागणार आहेत.  

नुकत्याच सादर झालेल्या OPPO A16s चे स्पेसिफिकेशन्स    

ओपो ए16एस स्मार्टफोनमध्ये कंपनीने 6.52 इंचाचा एचडी+ आयपीएस डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 20:9 अस्पेक्ट रेशियो आणि 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. या फोनमध स्टॅंडर्ड रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. वर सांगितल्याप्रमाणे या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी35 चिपसेट आणि पावरव्हीआर जीपीयू देण्यात आला आहे. हा ओप्पो फोन अँड्रॉइड 11 आधारित कलरओएस 11.1 वर चालतो. हा फोन 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजला सपोर्ट करतो.     

OPPO A16s च्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 13 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. पावर बॅकअपसाठी ओपो ए16एस मध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. 

Web Title: OPPO A54 and OPPO F19 Price Increased in India OPPO A16 Launched 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.