किंमत २२ हजारांपेक्षाही कमी; OnePlus नं लाँच केला ४० इंचाचा जबरदस्त फीचर्स असलेला Smart TV

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 04:01 PM2021-05-24T16:01:26+5:302021-05-24T16:02:35+5:30

कंपनीचा हा नवा टीव्ही OnePlus TV Y सीरिजचा एक भाग आहे. कंपनीनं या टीव्हीमध्ये दिलेत जबरदस्त फीचर्स

OnePlus TV 40Y1 launched in India with FHD display Android TV 9 0 Dolby Audio and more | किंमत २२ हजारांपेक्षाही कमी; OnePlus नं लाँच केला ४० इंचाचा जबरदस्त फीचर्स असलेला Smart TV

किंमत २२ हजारांपेक्षाही कमी; OnePlus नं लाँच केला ४० इंचाचा जबरदस्त फीचर्स असलेला Smart TV

googlenewsNext
ठळक मुद्देकंपनीचा हा नवा टीव्ही OnePlus TV Y सीरिजचा एक भाग आहे. कंपनीनं या टीव्हीमध्ये दिलेत जबरदस्त फीचर्स

सध्या जर तुम्ही नवा स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर OnePlus ही कंपनीनं स्वस्त आणि मस्त टीव्ही लाँच केला आहे. कंपनीनं सोमवारी भारतात आपला OnePlus TV 40Y1 लाँच केला. भारतात लाँच केलेला कंपनीचा हा सहावा टीव्ही आहे. हा OnePlus च्या Y सीरिजचा एक भाह आहे. हा एक बजेट फ्रेन्डली टीव्ही असल्याचंही म्हटलं जात आहे. पाहुया या टीव्हीतील जबरदस्त फीचर्स आणि किती आहे किंमत.

OnePlus TV 40Y1 या टीव्हीची भारतात किंमत 23,999 इतकी ठेवण्यात आली आहे. परंतु सध्या हा टीव्ही तुम्हाला कमी किंमतीत खरेदी करता येणार आहे. इट्रोडक्टरी ऑफर अंतर्गत २६ मे रोजी १२ वाजता या टीव्हीचा Flipkart वर सेल होणार असून या सेलमध्ये हा टीव्ही 21,999 रूपयांना खरेदी करता येईल. तसंच हा स्मार्ट टीव्ही OnePlus च्या ऑनलाईन स्टोअरवरही उपलब्ध असेल.

स्पेसिफिकेशन आणि फीचर्स

OnePlus TV 40Y1 या स्मार्ट टीव्हीमध्ये फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. तसंच याचं पिक्चर रिझॉल्युशन 1920*1080 इतकं आहे. हा टीव्ही तुम्हाला वॉल माऊंट किंवा टेबलवरही ठेवता येऊ शकतो. परंतु वॉल माऊंटसाठी तुम्हाला वेगळे स्टँड विकत घ्यावे लागणार आहेत. OnePlus TV 40Y1 मध्ये 64 बिट प्रोसेसर देण्यात आला असून टीव्हीमध्ये 1जीबी रॅम आणि 8 जीबी इंटरनल स्टोरेजही देण्यात आलं आहे. 

हा स्मार्ट टीव्ही अँड्रॉईड टीव्ही 9.0 पाय ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. याशिवाय यामध्ये इनबिल्ट क्रोमकास्ट, अॅसेक्सा सपोर्ट आणि गुगल असिस्टंसचा सपोर्टही देण्यात आला आहे. यामध्ये नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडीओ आणि युट्यूबसारखी अॅप्स प्रीलोडेड असतील. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये व्हायफाय, ब्लूटूथ 5.0, 2 एचडीएमआय पोर्ट्स, ऑप्टिकल डिजिटल ऑडिओ पोर्ट देण्यात आले आहेत. याशिवाय ऑडियोसाठी याणध्ये डॉल्बी ऑडिओ सपोर्टसोबत 20W स्पीकर्सही देण्यात आले आहेत. 
 

Web Title: OnePlus TV 40Y1 launched in India with FHD display Android TV 9 0 Dolby Audio and more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.