OnePlus Nord खरेदी करण्याची आज संधी, मिळणार जबरदस्त ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 12:17 PM2020-09-14T12:17:44+5:302020-09-14T12:18:00+5:30

फोनचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे एमोलेड डिस्प्ले, क्वाड रिअर कॅमेरा सेटअप आणि स्नॅपड्रॅगन 765 जी प्रोसेसर आहे.

oneplus nord sale on amazon india price features and offers | OnePlus Nord खरेदी करण्याची आज संधी, मिळणार जबरदस्त ऑफर

OnePlus Nord खरेदी करण्याची आज संधी, मिळणार जबरदस्त ऑफर

googlenewsNext

वनप्लसचा सर्वात स्वस्त आणि नवा हँडसेट OnePlus Nord पुन्हा एकदा विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.   या स्मार्टफोनसाठी अ‍ॅमेझॉन इंडियावर फ्लॅश सेल आयोजित करण्यात येणार आहे. OnePlus Nord 24,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीसह भारतात लॉन्च करण्यात आला होता. फोनचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे एमोलेड डिस्प्ले, क्वाड रिअर कॅमेरा सेटअप आणि स्नॅपड्रॅगन 765 जी प्रोसेसर आहे.

वनप्लस नॉर्डच्या 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 24,999 रुपये आहे. परंतु अद्याप हा मॉडेल सेलमध्ये उपलब्ध झालेला नाही. सेलमध्ये 8 जीबी रॅम आणि 12 जीबी रॅम व्हेरिएंट विक्रीसाठी उपलब्ध असतील. त्यांची किंमत अनुक्रमे 26,999 आणि 29,999 रुपये आहे. फोन मार्बल निळ्या आणि ऑनिक्स ब्लॅक रंगात खरेदी केला जाऊ शकतो. ऍमेझॉन इंडियाकडून ICIC बँक क्रेडिट कार्डच्या माध्यमातून फोन खरेदी करण्यासाठी 1 हजार रुपयांची अतिरिक्त सूटही मिळू शकेल. ही ऑफर क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड, ईएमआयद्वारे व्यवहार करणाऱ्यांसाठी उपलब्ध आहे.

वनप्लस नॉर्डमध्ये 6.44 इंचाचा फुल एचडी + एमोलेड डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90 हर्ट्झ आहे. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी आस्पेक्ट रेशो 20: 9 आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 765 जी प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी अड्रेनो 620 जीपीयू देण्यात आला आहे. हा फोन अँड्राइड 10 आधारित ऑक्सिजन ओएस 10.5वर चालतो. कॅमेर्‍याबद्दल सांगायचे झाल्यास डुअल एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा प्रायमरी, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-अँगल, 2 मेगापिक्सेल मॅक्रो आणि 5 मेगापिक्सेल डेप्थ कॅमेरा आहे. फोनमध्ये 32 मेगापिक्सेल आणि पुढच्या बाजूला 8 मेगापिक्सलचे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. वनप्लस नॉर्डला ताकदवान बनवण्यासाठी 4115mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 30T रॅप चार्जवर चार्ज केली जाते. फोनमध्ये 5 जी सपोर्ट, फेस अनलॉक आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरही देण्यात आला आहे.

Web Title: oneplus nord sale on amazon india price features and offers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.