OnePlus लाँच करणार स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन; लाँचपूर्वीच वेबसाईटवर लिस्ट झाला Nord 3  

By सिद्धेश जाधव | Published: May 10, 2022 04:09 PM2022-05-10T16:09:43+5:302022-05-10T16:09:49+5:30

OnePlus Nord 3 स्मार्टफोन व्हर्टिया सर्टिफिकेशन वेबसाईटवर दिसला आहे. त्यामुळे लवकरच भारतात हा फोन येणार असल्याची माहिती मिळाली आहे.  

OnePlus Nord 3 May Launch Soon In India Spotted On BIS  | OnePlus लाँच करणार स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन; लाँचपूर्वीच वेबसाईटवर लिस्ट झाला Nord 3  

OnePlus लाँच करणार स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन; लाँचपूर्वीच वेबसाईटवर लिस्ट झाला Nord 3  

googlenewsNext

OnePlus यंदा अर्धा डझन स्मार्टफोन सप्टेंबरच्या आत सादर करणार आहे, अशी बातमी काही महिन्यांपूर्वी आली होती. आणि आता ही बातमी खरी होत असल्याचं दिसत आहे. OnePlus Nord 3 लवकरच भारतात लाँच होऊ शकतो. हा फोन भारतीय सर्टिफिकेशसन साईटवर लिस्ट झाला आहे. या फोनचे कोणतेही स्पेक्स मात्र अजूनही लीक झाले नाहीत.  

टिप्सटर मुकुल शर्मानं दिलेल्या माहितीनुसार, OnePlus Nord 3 स्मार्टफोन Indian BIS सर्टिफिकेशन वेबसाईटवर दिसला आहे. यावरून हा फोन लवकरच भारतात लाँच होणार हे स्पष्ट झालं आहे. कंपनीनं मात्र याबाबत कोणतीही अधीकृत माहिती दिली नाही. OnePlus Nord 3 स्मार्टफोन जुन्या OnePlus Nord 2 ची जागा घेईल. गेल्यावर्षी जुलैमध्ये नॉर्ड 2 आल्यामुळे सीरिजमधील आगामी हँडसेट जुलै पर्यंत येण्याची शक्यता आहे.  

काही दिवसांपूर्वी आलेल्या OnePlus 10R चे स्पेसिफिकेशन्स  

प्रोसेसिंगसाठी कंपनीनं मीडियाटेक डिमेनसिटी 8100 मॅक्स चिपसेटचा वापर केला आहे. एआयनाही मीडियाटेक एपीयू 580 आणि ग्राफिक्ससाठी माली-जी610 जीपीयू आहे. हा अँड्रॉइड 12 बेस्ड आक्सिजन ओएस 12.1 वर चालतो. चांगल्या परफॉर्मन्ससाठी 3D Passive Cooling System आणि HyperBoost Gaming Engine असे फीचर्स देखील आहेत.  

फोटोग्राफीसाठी वनप्लस 10आर स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स तसेच 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आहे. फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो.  

वनप्लस 10आर स्मार्टफोन 6.7 इंचाचा फ्लुइड अ‍ॅमोलेड डिस्प्लेहं बाजारात आला आहे. ज्यात 120हर्ट्ज रिफ्रेश रेटसह 720हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट आणि 1000हर्ट्ज रिस्पांस रेट मिळतो. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असलेला हा डिवाइस कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 च्या सुरक्षेसह बाजारात आला आहे. तसेच 394पीपीआय, 10बिट कलर एचडीआर10+ इत्यादी फीचर्स देखील आहेत.  

वनप्लस 10आर च्या एका मॉडेलमध्ये 80W SUPERVOOC फास्ट चार्जिंगसह 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. जी 32 मिनिटांत फुल चार्ज होते. तर 150W SuperVOOC फास्ट चार्जिंगसह 4,500एमएएच बॅटरी असलेला आणखी एक मॉडेल सादर करण्यात आला आहे. जो फक्त 5 मिनिटांत 50 टक्के तर 17 मिनिटांत फुलचार्ज होऊ शकतो.    

Web Title: OnePlus Nord 3 May Launch Soon In India Spotted On BIS 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.