ठरलं तर! 19 मेला भारतात येतोय OnePlus चा आणखी एक स्वस्त फोन, 80W फ़ास्ट चार्जिंग आणि 12GB RAM 

By सिद्धेश जाधव | Published: May 13, 2022 11:55 AM2022-05-13T11:55:43+5:302022-05-13T11:55:52+5:30

OnePlus Nord 2T 5G स्मार्टफोन भारतात 19 मेला लाँच होणार असल्याची माहिती कंपनीनं दिली आहे.  

OnePlus Nord 2T 5G Is Launching In India On 19 May  | ठरलं तर! 19 मेला भारतात येतोय OnePlus चा आणखी एक स्वस्त फोन, 80W फ़ास्ट चार्जिंग आणि 12GB RAM 

ठरलं तर! 19 मेला भारतात येतोय OnePlus चा आणखी एक स्वस्त फोन, 80W फ़ास्ट चार्जिंग आणि 12GB RAM 

Next

OnePlus Nord 2T काही दिवसांपूर्वी युरोपमध्ये सादर करण्यात आला होता. आता या फोनच्या भारतीय लाँचची माहिती कंपनीनं दिली आहे. OnePlus Nord 2T 5G भारतात 19 मेला लाँच होणार आहे. एका ऑनलाईन इव्हेंटमधून हा डिवाइस भारतात येईल. या इव्हेंटच थेट प्रक्षेपण 19 मेला संध्याकाळी 7:30 वाजल्यापासून वनप्लसच्या युट्युब चॅनलवर करण्यात येईल.  

OnePlus Nord 2T ची संभाव्य किंमत 

OnePlus Nord 2T चा एकच व्हेरिएंट युरोपमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. तिथे याची किंमत 399 यूरो (सुमारे 32,000 रुपये) ठेवण्यात आली आहे. भारतीय किंमत 25,000 ते 30,000 रुपयांच्या आत असू शकते. 

OnePlus Nord 2T चे स्पेसिफिकेशन्स  

OnePlus Nord 2T स्मार्टफोन नॉर्ड सीरिजमधील सर्वात प्रीमियम डिवाइस आहे. त्यामुळे यात अनेक स्पेक्स अपग्रेड करण्यात आले आहेत. हा फोन 6.43 इंचाच्या फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह येतो. जो पंच होल डिजाईनसह 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड 12 आधारित ऑक्सिजन ओएस 12.1 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी मीडियाटेकचा डिमेन्सिटी 1300 चिपसेट देण्यात आला आहे. सोबत 8GB रॅम आणि 128GB मेमरी मिळते.  

फोटोग्राफीसाठी बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 50MP Sony IMX766 सेन्सर मुख्य कॅमेरा म्हणून मिळतो. हा सेन्सर OIS ला सपोर्ट करतो. त्याचबरोबर 8MP ची अल्ट्रावाईड लेन्स आणि 2MP चा मोनोक्रोम सेन्सर आहे. फ्रंटला 32MP चा सेल्फी शुटर आहे. OnePlus Nord 2T मध्ये 4500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. त्यामुळे फक्त 15 मिनिटांत दिवसभराचा बॅटरी बॅकअप मिळतो, असा दावा कंपनीनं केला आहे.   

Web Title: OnePlus Nord 2T 5G Is Launching In India On 19 May 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.