OnePlus ने केली ‘या’ दमदार स्मार्टफोनची किंमत कमी; जाणून घ्या नवीन किंमत  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 04:14 PM2021-06-09T16:14:17+5:302021-06-09T16:15:39+5:30

Oneplus 8T Price Cut: OnePlus 8T चा छोटा व्हेरिएंट आता 38,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल, या व्हेरिएंटमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. 

Oneplus 8t gets price cut in india check new price and specifications  | OnePlus ने केली ‘या’ दमदार स्मार्टफोनची किंमत कमी; जाणून घ्या नवीन किंमत  

OnePlus ने केली ‘या’ दमदार स्मार्टफोनची किंमत कमी; जाणून घ्या नवीन किंमत  

Next

OnePlus ने आपल्या दमदार स्मार्टफोन OnePlus 8T ची किंमत कमी केली आहे. OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro च्या लाँचनंतर दुसऱ्यांदा कंपनीने OnePlus 8T स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे. या स्मार्टफोनच्या दोन्ही व्हेरिएंट्सची किंमत कंपनीने 1000 रुपयांनी कमी केली आहे. चला जाणून घेऊया OnePlus 8T ची भारतातील नवीन किंमत आणि स्पेसिफिकेशन्स. (Oneplus 8t gets price cut of 1000 Rs in India) 

OnePlus 8T ची नवीन किंमत 

OnePlus 8T चा छोटा व्हेरिएंट आता 38,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल, या व्हेरिएंटमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. वनप्लसचा 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेला मॉडेल आता 41,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. यापूर्वी हे दोन्ही व्हेरिएंट्स अनुक्रमे 39,999 रुपये आणि 42,999 रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध होते. या स्मार्टफोनच्या नव्या किंमती OnePlus India च्या वेबसाइट आणि Amazon India वर लिस्ट करण्यात आली आहेत. 

OnePlus 8T चे स्पेसिफिकेशन्स 

OnePlus 8T स्मार्टफोन कंपनीने Qualcomm Snapdragon 865 SoC सह सादर केला होता. वनप्लसचा हा स्मार्टफोन 8GB आणि 12GB रॅमसह सादर केला गेला होता. या स्मार्टफोनमध्ये 6.55 इंचाचा full HD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. या स्मार्टफोनच्या फ्रंटला 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.  

OnePlus 8T स्मार्टफोनच्या मागे क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनचा मुख्य कॅमेरा 48MP चा आहे, या मुख्य कॅमेऱ्यासोबत 8MP चा अल्ट्रा वाइड कॅमेरा सेन्सर, 5MP चा मॅक्रो कॅमेरा आणि 2MP चा मोनोक्रोम कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी आणि 65W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे. तसेच, या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, स्टीरियो स्पीकर देण्यात आला आहे. 

Web Title: Oneplus 8t gets price cut in india check new price and specifications 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.