फक्त 2,799 रुपयांमध्ये नोकियाने लाँच केला 4G फोन; जाणून घ्या Nokia 110 4G चे वैशिष्ट्ये 

By सिद्धेश जाधव | Published: July 23, 2021 05:26 PM2021-07-23T17:26:44+5:302021-07-23T17:29:42+5:30

Nokia 110 4G Launched in India: Nokia 110 4G भारतात 2,799 रुपयांमध्ये लाँच केला गेला आहे. हा फोन Yellow, Aqua आणि Black रंगात उपलब्ध होईल.

Nokia 110 4G feature phone launched in India with Volte support price rs 2799 vs JioPhone  | फक्त 2,799 रुपयांमध्ये नोकियाने लाँच केला 4G फोन; जाणून घ्या Nokia 110 4G चे वैशिष्ट्ये 

नोकिया 110 4जी फोनची विक्री 24 जुलैपासून सुरु होईल

googlenewsNext

गेल्याच महिन्यात नोकियाने दोन 4G फिचर फोन जागतिक बाजारात लाँच केले होते. हे फोन्स कंपनीने Nokia 110 4G आणि Nokia 105 4G नावाने बाजारात आले होते. आता यातील Nokia 110 4G फोन कंपनीने भारतात लाँच केला आहे, ज्याची किंमत फक्त 2,799 रुपये आहे. (Nokia 110 4G Feature Phone With HD Calling Launched in India)

Nokia 110 4G ची किंमत  

Nokia 110 4G भारतात 2,799 रुपयांमध्ये लाँच केला गेला आहे. हा फोन Yellow, Aqua आणि Black रंगात उपलब्ध होईल. नोकिया 110 4जी फोनची विक्री 24 जुलैपासून सुरु होईल आणि हा नोकिया फोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइट सोबतच शॉपिंग साइट अ‍ॅमेझॉन इंडियावरून विकत घेता येईल. 

Nokia 110 4G Phone फीचर्स व स्पेसिफिकेशन्स 

नोकिया 110 4जी मध्ये कंपनीने 1.8 इंचाचा QQVGA डिस्प्ले दिला आहे. हा फोन Series 30+ ऑपरेटिंग  सिस्टमवर चालतो, तसेच यात प्रोसेसिंगसाठी Unisoc T107 चिपसेट देण्यात आला आहे. Nokia 110 4G फोनमध्ये 128एमबी रॅम आणि 48एमबी इंटरनल स्टोरेज मिळते. ही स्टोरेज 32 जीबी पर्यंत माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते.  

या फिचर फोनमध्ये 0.08MP QVGA रियर कॅमेरा मिळतो. तसेच या फोनमध्ये टॉर्च, एफएम रेडिओ, एमपी3 प्लेयर आणि 3.5mm हेडफोन जॅक असेल फीचर्स देखील देण्यात आले आहेत. हा एक ड्युअल सिम फोन आहे जो VoLTE सपोर्टसह सादर करण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी Nokia 110 4G फोनमध्ये 1,020mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.  

Web Title: Nokia 110 4G feature phone launched in India with Volte support price rs 2799 vs JioPhone 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.