अलर्ट! Google वर चुकूनही 'या' गोष्टी करू नका सर्च, पडू शकतं महागात; वेळीच घ्या खबरदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2021 06:30 PM2021-03-02T18:30:54+5:302021-03-02T18:39:50+5:30

Google Search : राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते. मात्र ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण हे सध्या वाढले आहे.

never google search these important things you may get losses | अलर्ट! Google वर चुकूनही 'या' गोष्टी करू नका सर्च, पडू शकतं महागात; वेळीच घ्या खबरदारी

अलर्ट! Google वर चुकूनही 'या' गोष्टी करू नका सर्च, पडू शकतं महागात; वेळीच घ्या खबरदारी

Next

नवी दिल्ली - गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते. मात्र ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण हे सध्या वाढले आहे. गुगलवर एखादी वेबसाईट अथवा यूआरएल ओपन करणं महागात पडू शकतं. त्यामुळे गुगलवर एखादी माहिती शोधताना सतर्क असणं गरजेचं आहे. गुगलवर कोणत्या गोष्टी सर्च करणं महागात पडू शकतं हे जाणून घेऊया...

बँक वेबसाईट

जर तुम्ही ऑनलाईन बँकिंग करत असताना अनेकदा काही गोष्टी या गुगलवर सर्च केल्या जातात. मात्र बँकेसंबंधित कोणतीही गोष्ट सर्च करू नका. बँकिंग फ्रॉडसाठी सायबर क्रिमिनल हे फेक वेबसाईटन तयार करून ग्राहकांना आपल्या जाळ्यात फसवतात. बँकेसारखीच माहिती या ठिकाणी उपलब्ध करून देतात. मात्र ते बँकिंग डेटाची चोरी करू शकतात. यामुळे तुमचे बँक खाते सुद्धा रिकामे करू शकतात.

कस्टमर केअर

गुगलवर हमखास कस्टमर केअर नंबर हा सर्च केला जातोच. मात्र सायबर क्रिमिनल चुकीचा कस्टमर केअर नंबर देऊन तुमची आवश्यक माहिती चोरी करू शकतात. ही माहिती चोरी केल्यानंतर तुम्हाला आर्थिक फटका बसण्याची शक्यता अधिक असते.

Apps किंवा सॉफ्टवेअर

मोबाईल Apps आणि सॉफ्टवेअर अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. अनेकदा सायबर क्रिमिनल फेक Apps आणि सॉफ्टवेअर गुगल सर्चमध्ये टाकत असतात. तुम्ही जर ते डाऊनलोड केलं तर त्यातून ते तुमची पर्सनल माहिती चोरी करू शकतात. 

सरकारी योजना

विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी त्याबाबतची माहिती ही सर्च केली जाते. मात्र कोणत्याही सरकारी योजनेची माहिती अशा पद्धतीने सर्च करून घेऊ नका. अधिकृत वेबसाईटवर जाऊन त्याची माहिती घ्या. 

कूपन कोड

ऑनलाईन शॉपिंग दरम्यान अनेकदा कूपन कोडद्वारे डिस्काउंट दिले जातात. परंतु, अनेकदा फ्री कूपन कोडसाठी गुगलवर सर्चिंग केले जाते. एक्स्पर्ट्सच्या माहितीनुसार, कूपन कोड शोधण्यासाठी गुगल सर्चची मदत घेणे धोक्याचे ठरू शकतं. यामुळे फसवणूक होण्याची शक्यता आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: never google search these important things you may get losses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.