Netflix वर चित्रपट बघण्यासोबत खेळता येणार Video Games; पुढल्यावर्षी मिळू शकतो गेमिंगचा पर्याय 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 07:09 PM2021-07-15T19:09:08+5:302021-07-15T19:09:58+5:30

Video Games on Netflix: साल 2022 पर्यंत Netflix आपल्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ गेम सादर करण्याचा विचार करत आहे. यासाठी कंपनी वेगळे शुल्क आकारण्याची योजना आखात आहे.

Netflix plans to offer video games with movies and tv shows  | Netflix वर चित्रपट बघण्यासोबत खेळता येणार Video Games; पुढल्यावर्षी मिळू शकतो गेमिंगचा पर्याय 

Netflix वर चित्रपट बघण्यासोबत खेळता येणार Video Games; पुढल्यावर्षी मिळू शकतो गेमिंगचा पर्याय 

googlenewsNext

स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मसाठी समानार्थी शब्द म्हणजे Netflix. चित्रपट आणि वेब मालिका आवडणाऱ्या लोकांनी एकदातरी नेटफ्लिक्स वापरले असेल. परंतु आता नेटफ्लिक्स व्हिडीओ स्ट्रीमिंग पुरते मर्यादित राहणार नाही. अलीकडेच आलेल्या काही रिपोर्ट्सनुसार Netflix लवकरच गेमिंग सेगमेंटमध्ये पदार्पण करण्याची तयारी करत आहे. याचा अर्थ असा कि, लवकरच तुम्हाला Netflix वर व्हिडीओ गेम खेळता येतील. यासाठी नेटफ्लिक्सने इलेक्ट्रॉनिक आर्ट्स आणि फेसबुक या कंपन्यांच्या माजी कर्मचाऱ्यांना कंपनीत घेतले आहे.  (Netflix hires Facebook gaming executive Mike Verdu)

मीडिया रिपोर्टनुसार, साल 2022 पर्यंत Netflix आपल्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ गेम सादर करण्याचा विचार करत आहे. यासाठी कंपनी वेगळे शुल्क आकारण्याची योजना आखात आहे. कंपनीने आपल्या वेबसाइटवर गेम डेवलपर पदासाठी जाहिरात देण्यास सुरुवात केली आहे.  

Netflix ची नवीन व्हिडीओ गेमिंग सर्विस Apple Arcade सारखी असेल, अशी चर्चा आहे. ही सेवा सब्सक्रिप्शन आधारित व्हिडीओ गेम सेवा देऊ शकते. म्हणजे ग्राहकांना प्रत्येक महिन्याला शुल्क भरून गेम खेळता येतील. हे गेम्स कोणते असतील किंवा यांचा वापर नेटफ्लिक्समध्ये कसा केला जाईल याची कोणतीही माहिती समोर आली नाही. तसेच या गेमिंग सर्विसबाबत कंपनीने देखील कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.  

Web Title: Netflix plans to offer video games with movies and tv shows 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.