गेमर्ससाठी आनंदाची बातमी! प्रजासत्ताक दिनी FAU-G होणार लॉन्च; 'असा' करा डाऊनलोड

By देवेश फडके | Published: January 4, 2021 10:15 AM2021-01-04T10:15:21+5:302021-01-04T10:23:56+5:30

नोव्हेंबर २०२० मध्ये बॉलिवूडचा खिलाडी म्हणून ओळख असलेल्या अक्षय कुमारने घोषित केलेला बहुप्रतिक्षित FAU-G प्रजासत्ताक दिनी लॉन्च केला जाणार आहे. या गेमसाठी १० लाखांहून अधिक प्री-रजिस्ट्रेशन झाले आहेत.

mobile game fau g will be launched on Republic Day in india | गेमर्ससाठी आनंदाची बातमी! प्रजासत्ताक दिनी FAU-G होणार लॉन्च; 'असा' करा डाऊनलोड

गेमर्ससाठी आनंदाची बातमी! प्रजासत्ताक दिनी FAU-G होणार लॉन्च; 'असा' करा डाऊनलोड

googlenewsNext
ठळक मुद्देबहुप्रतिक्षित FAU-G गेम प्रजासत्ताक दिनी होणार लॉन्चबॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार असणार ब्रँड अॅम्बॅसिडरगेममधून मिळालेल्या कमाईचा काही वाटा वीर ट्रस्टला दान देणार

नवी दिल्ली : काही कालावधीत प्रचंड लोकप्रिय झालेल्या PUBG गेमला भारतात बंदी घातल्यानंतर मोठ्या प्रमाणात गेमर्समध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, यावर उतारा म्हणून अवघ्या काही दिवसांमध्ये PUBG च्या धर्तीवर FAU-G गेमची घोषणा बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने केली होती. FAU-G ची घोषणा झाल्यापासून या गेमची तरुणांमध्ये खूप उत्सुकता असून, याची आतुरतेने वाट पाहिली जात होती. आता ही प्रतिक्षा संपली असून, २६ जानेवारी २०२१ रोजी FAU-G लॉन्च केला जाणार आहे. 

FAU-G गेमच्या दमदार ट्रेलरमुळे याविषयीची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये गेमची घोषणा करण्यात आल्यानंतर प्री-रजिस्ट्रेशनसाठी सुरुवात झाली होती. पहिल्या २४ तासांत १० लाख जणांनी नोंदणी केली होती. बेंगळुरू येथील nCORE Games डेव्हलपर्स FAU-G गेमची निर्मिती करणार आहेत.  

गेमच्या कमाईतील वाटा वीर ट्रस्टला दान करणार

अक्षय कुमारने आपल्या ट्विटर अकाउंटवर या गेमचे एंथम जारी केले आहे. त्याचसोबत अक्षय कुमारने गेमच्या प्री-रजिस्ट्रेशनची लिंकही फॅन्ससोबत शेअर केली आहे. या लिंकमार्फत युझर्स गेमसाठी प्री-रजिस्ट्रेशन करु शकतात. पंतप्रधान मोदींच्या आत्मनिर्भर भारत अभियानाला पाठिंबा म्हणून हा अॅक्शन गेम सादर करताना मला अतिशय अभिमान वाटत आहे. निडर आणि एकतेचे प्रतिक गार्ड्स - फौजी. या मोबाईल गेममधून मिळणाऱ्या महसुलाचा २० टक्के वाटा भारताच्या वीर ट्रस्टला दान केला जाणार आहे, असे अक्षय कुमारने यापूर्वीच स्पष्ट केले होते. 

कसा डाऊनलोड कराल FAU-G?

- फौ-जी गेम लॉन्च झाल्यानंतर प्ले स्टोरवर उपलब्ध होईल.
- प्ले स्टोरसह ऑफिशिअल वेबसाइटवरूनही हा गेम डाऊनलोड करता येणार आहे.
- फौ-जी गेमसंदर्भातील सर्व माहिती गेमचे प्रमोटर्स nCore गेम्स मार्फत देण्यात येत आहे.

दरम्यान, गलवान खोऱ्यात भारत-चीन सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक झटापटीनंतर केंद्र सरकारने २७ जुलै २०२० रोजी ५० चिनी अॅपवर बंदी घातली होती. यानंतर ०२ सप्टेंबर २०२० रोजी आणखी ११८ अॅपवर बंदी घालण्यात आली. यामध्ये पब्जी, टिकटॉकसारख्या अॅप्सचा समावेश होता. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर अक्षय कुमारने FAU-G या गेमची घोषणा केली होती. अक्षय कुमार या गेमचा ब्रँड अॅम्बॅसिडर आहे. 

 

Web Title: mobile game fau g will be launched on Republic Day in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.