Windows 11 सपोर्टसह Microsoft Surface Go 3 भारतात लाँच; अ‍ॅमेझॉनवर करता येणार प्री-आर्डर  

By सिद्धेश जाधव | Published: November 17, 2021 05:41 PM2021-11-17T17:41:04+5:302021-11-17T17:41:13+5:30

Budget Laptop Microsoft Surface Go 3: Microsoft Surface Go 3 चे 4 व्हेरिएंट भारतात उपलब्ध झाले आहेत. हा लॅपटॉप Windows 11, Intel Core i3 आणि 8GB पर्यंत RAM सह बाजारात आला आहे.  

Microsoft surface go 3 launched in india with intel core i3 processor check price specifications offers and more  | Windows 11 सपोर्टसह Microsoft Surface Go 3 भारतात लाँच; अ‍ॅमेझॉनवर करता येणार प्री-आर्डर  

Windows 11 सपोर्टसह Microsoft Surface Go 3 भारतात लाँच; अ‍ॅमेझॉनवर करता येणार प्री-आर्डर  

Next

Microsoft ने भारतात Surface Go 3 लॅपटॉप Windows 11 सह सादर केला आहे. हा डिवाइस जागतिक बाजारात सप्टेंबरमध्ये लाँच करण्यात आला होता. यात 10th-gen Intel Core i3 प्रोसेसर आणि Intel Pentium Gold चिप देण्यात आली आहे. हा 2-in-1 डिवाइस आहे जो लॅपटॉप आणि टॅबलेट असे दोन्हीचे काम करतो. यात 3:2 आस्पेक्ट रेशियो असलेला टच डिस्प्ले देण्यात आला आहे.  

Microsoft Surface Go 3 चे स्पेसिफिकेशन्स  

Microsoft ने Surface Go 3 हा अफोर्डेबल 2-in-1 टॅबलेट सादर केला आहे. यात 10.5 इंचाची टच स्क्रीन मिळते. कंपनीने यात Intel Core i3 प्रोसेसरचा वापर केला आहे. हा देखील लेटेस्ट Windows 11 प्लॅटफॉर्मवर चालेल. हा LTE अ‍ॅडव्हान्स कनेक्टिविटी फीचरसह येतो. यात ऑल डे बॅटरी आणि बिल्ट-इन मायक्रोसॉफ्ट सिक्योरिटी फीचर देण्यात आले आहे. साउंडसाठी यात Dolby Audio फीचर मिळतो. 

या डिवाइसच्या बॅक आणि फ्रंट दोन्ही बाजूंना 1080p रिजोल्यूशन कॅमेरा आहेत. तसेच यात Studio Microphones देखील मिळतात, यामुळे विडियो कॉलचा अनुभव सुधारतो. हा लॅपटॉप Surface Go Signature Type Cover सपोर्टसह सादर करण्यात आला आहे.  

Micrsoft Surface Go 3 ची किंमत आणि ऑफर्स  

हा लॅपटॉप अ‍ॅमेझॉन इंडियावरून -आर्डर करता येईल. प्री-आर्डर केल्यास या लॅपटॉपसह 9,699 रुपयांचा Surface Pen मोफत देण्यात येईल Microsoft Surface Go 3 लॅपटॉप 23 नोव्हेंबरपासून खरेदीसाठी उपलब्ध होईल. 

  • Microsoft Surface Go 3 च्या टॉप-अँड मॉडेलमध्ये 10th-gen Intel Core i3 प्रोसेसर, 8GB RAM आणि 128GB SSD स्टोरेज देण्यात आली आहे. या व्हर्जनची किंमत 62,999 रुपये ठेवण्यात आली आहे.  
  • या लॅपटॉपचा दुसरा व्हेरिएंट 10th-gen Intel Pentium Gold प्रोसेसरवर चालतो. ज्यात 8GB RAM आणि 128GB SSD स्टोरेजमिळते. या व्हेरिएंटसाठी 57,999 रुपये मोजावे लागतील.  
  • या लॅपटॉपचा 10th-gen Intel Core i3 प्रोसेसर, 4GB RAM आणि 64GB eMMC स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटसाठी 47,999 रुपये द्यावे लागतील.  
  • Microsoft Surface Go 3 च्या लो-अँड व्हेरिएंटची किंमत 42,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या डिवाइसमध्ये 10th-gen Intel Pentium Gold सह 4GB RAM आणि 64GB eMMC स्टोरेज मिळते. 

Web Title: Microsoft surface go 3 launched in india with intel core i3 processor check price specifications offers and more 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.