mi fan festival 2021 buy mi 10i at rupees 1 today here is how to get this offer | Mi Fan सेल सुरू; केवळ एका रूपयांत खरेदी करा २१ हजारांचा स्मार्टफोन

Mi Fan सेल सुरू; केवळ एका रूपयांत खरेदी करा २१ हजारांचा स्मार्टफोन

ठळक मुद्देXiaomi च्या अनेक वस्तू एक रूपयात खरेदी करण्याची संधी

जर तुम्हाला Mi च्या स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा स्मार्ट होम प्रोडक्ट खरेदी करायचे असतील तर तुमच्याकडे आता उत्तम संधी आहे. गुरूवारपासून Mi Fan सेलला सुरूवात करण्यात आली आहे. हा सेल १३ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. Mi Fan Festival सेल दरम्यान Xiaomi केवळ एका रूपयात आपल्या प्रोडक्ट्सची विक्री करत आहे. या सेलदरम्यान तुम्हाला Mi 10i, Mi TV 4A 32 Horizon Edition, Redmi 9 Power, Mi Neckband ब्लूटूथ इयरफ़ोन सारखे प्रोडक्ट्स आणि Mi बियर्ड ट्रिमर 1 C एका रूपयात खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
 
सेलच्या पहिल्या दिवशी कंपनीनं Mi 10i हा स्मार्टोफोन एका रुपयात उपलब्ध करून दिला. फ्लॅश सेल सुरू झाल्यानंतर हा फोन एका रूपयात खरेदी करण्याची संधी कंपनीनं दिली आहे. सेलदरम्यान Mi 10i च्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला स्मार्टफोन एका रूपयात विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आलाय. या स्मार्टफोनची किंमत २१,९९९ रूपये आहे. 

Mi 10i या स्मार्टफोनमद्ये 6.67 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आहे. तसंच यात Qualcomm Snapdragon 750G प्रोसेसर आहे. हा स्मार्टफोन MIUI 12 ऑपरेटिंग सिस्टमवर करतोय या स्मार्टफोनचा प्रायमरी कॅमेरा 108 मेगापिक्सेलचा आहे. याशिवाय मागील बाजूला आणखी तीन कॅमेरे देण्यात आलेत. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सेलचा फ्रन्ट कॅमेरा देण्यात आला असून या स्मार्टफोनमध्ये 4,820mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
 

Web Title: mi fan festival 2021 buy mi 10i at rupees 1 today here is how to get this offer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.