7500mAh बॅटरीसह ‘मेड इन इंडिया’ Lenovo Tab K1 लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

By सिद्धेश जाधव | Published: October 25, 2021 03:55 PM2021-10-25T15:55:30+5:302021-10-25T15:55:55+5:30

Lenovo Tab K10 Price Offers and Sale In India: कंपनीने मिडरेंज सेगमेंटमध्ये एक नवीन टॅबलेट Lenovo Tab K10 नावाने देशात भारतात लाँच केला आहे. हा टॅब मेड इन इंडिया असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

Lenovo Tab K10 launched in india specs price sale offer  | 7500mAh बॅटरीसह ‘मेड इन इंडिया’ Lenovo Tab K1 लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

7500mAh बॅटरीसह ‘मेड इन इंडिया’ Lenovo Tab K1 लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

Next

गेल्या आठवड्यात Lenovo ने भारतात Lenovo Yoga Tab 11 लाँच केला होता. हा टॅबमध्ये 2K रिजोल्यूशन असलेला शानदार डिस्प्ले आणि 7500mAh बॅटरी असे भन्नाट स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. त्यानुसार या टॅबची किंमत देखील जास्त होती. परंतु आज कंपनीने मिडरेंज सेगमेंटमध्ये एक नवीन टॅबलेट Lenovo Tab K10 नावाने देशात भारतात लाँच केला आहे. 

Lenovo Tab K10 चे स्पेसिफिकेशन्स 

Lenovo Tab K10 मध्ये 10.3 इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले फुलएचडी रिजोल्यूशन 70.3% एनटीएससी आणि 400 निट्स ब्राईटनेसला सपोर्ट करतो. हा टॅब अँड्रॉइड 11 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी यात ऑक्टकोर प्रोसेसरसह मीडियाटेकचा हीलियो पी22टी चिपसेट देण्यात आला आहे. ज्याला 4GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंतच्या स्टोरेजची जोड देण्यात आली आहे.  

फोटोग्राफीसाठी या डिवाइसमध्ये दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. यातील रियर कॅमेरा 8 मेगापिक्सलचा आहे., तर सेल्फी कॅमेरा 5 मेगापिक्सलच्या रिजोल्यूशनसह येतो. लेनोवोचा या टॅबलेटमध्ये ड्युअल स्पिकर ड्युअल डॉल्बी सपोर्ट मिळतो. तसेच कंपनीने बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स दिले आहेत. पॉवर बॅकअपसाठी या टॅबमध्ये 7,500एमएएचची मोठी मिळते.  

Lenovo Tab K10 ची किंमत 

लेनोवो टॅब के10 तीन व्हेरिएंट देशात आले आहेत. यातील 3GB रॅमसह 32GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 25,000 पासून सुरु होते. 4GB रॅमसह 64GB इंटरनल स्टोरेज आणि 4GB रॅमसह 128GB इंटरनल मेमरी असेलल्या व्हेरिएंटची किंमत मात्र अजून कंपनीने सांगितली नाही.  

Web Title: Lenovo Tab K10 launched in india specs price sale offer 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.