लो बजेटमध्ये लाँच Lenovo K13 Note लाँच; 5000mAh बॅटरी, 4GB रॅम आणि 48MP कॅमेऱ्यासह झाला सादर  

By सिद्धेश जाधव | Published: June 22, 2021 04:21 PM2021-06-22T16:21:24+5:302021-06-22T16:22:30+5:30

Lenovo K13 Note Launch: Lenovo K13 Note रशियात लाँच झाला असून हा Moto G10 चा रीब्रँडेड व्हर्जन वाटत आहे.  

Lenovo k13 note launched in russia price specifications   | लो बजेटमध्ये लाँच Lenovo K13 Note लाँच; 5000mAh बॅटरी, 4GB रॅम आणि 48MP कॅमेऱ्यासह झाला सादर  

Lenovo K13 Note चा फक्त एकाच व्हेरिएंट रशियात ऑरोरा ग्रे आणि पर्ल सकुरा कलर ऑप्शनमध्ये सादर केला गेला आहे.

Next

गेले कित्येक दिवस चर्चेत राहिल्यानंतर अखेरीस Lenovo ने Lenovo K13 Note स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन रशियात लाँच करण्यात आला आहे. हा फोन Moto G10 चा रीब्रँडेड व्हर्जन वाटत आहे. चला जाणून घेऊया या लो बजेट लेनोवो स्मार्टफोनची संपूर्ण माहिती. (Lenovo K13 Note launched in Russia with snapdragon 460 and 4GB RAM) 

Lenovo K13 Note ची किंमत 

Lenovo K13 Note चा फक्त एकाच व्हेरिएंट रशियात ऑरोरा ग्रे आणि पर्ल सकुरा कलर ऑप्शनमध्ये सादर केला गेला आहे. यात 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. रशियात Lenovo K13 Note ची किंमत RUB 12,490 (12,700 रुपये) ठेवण्यात आली आहे. हा फोन भारतासह इतर मार्केट्समध्ये कधी उपलब्ध होईल याची कोणतीही माहिती कंपनीने दिली नाही.  

लेनोवो K13 नोट चे स्पेसिफिकेशन 

Lenovo K13 Note मध्ये 6.5-इंचाचा HD+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले 1600 x 720 पिक्सल रेजोल्यूशनसह देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा अस्पेक्ट रेशियो 20:9 आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 460 चिपसेट देण्यात आला आहे. 4GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज असलेला या फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येते. या Android 11 वर चालणाऱ्या स्मार्टफोनमध्ये सिक्योरिटीसाठी मागे फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. 

फोटोग्राफीसाठी K13 नोटमधील क्वाड-कॅमेरा सेटअपमध्ये 48MP चा मुख्य कॅमेरा, 8MP ची अल्ट्रा-वाईड-अँगल लेन्स, 2MP चा डेप्थ सेन्सर आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा आहे. या फोनमध्ये 8MP चा सेल्फी कॅमेरा आहे. पावर बॅकअपसाठी Lenovo K13 Note मध्ये 5000mAh ची बॅटरी आहे.  

Web Title: Lenovo k13 note launched in russia price specifications  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app