मोठा खुलासा! EMI वेळेवर दिला नाही तर कंपनी लॉक करणार Jio Phone Next 4G  

By सिद्धेश जाधव | Published: November 4, 2021 06:50 PM2021-11-04T18:50:45+5:302021-11-04T18:56:25+5:30

Jio Phone Next 4G फायनान्स ऑप्शन्सचा वापर करून 1999 रुपये देऊन घरी आणता येईल. परंतु ईएमआय वेळेवर न दिल्यास हा फोन लॉक केला जाऊ शकतो.  

Jio phone next device lock feature may lock phone of users upon non payment of jio phone emi   | मोठा खुलासा! EMI वेळेवर दिला नाही तर कंपनी लॉक करणार Jio Phone Next 4G  

मोठा खुलासा! EMI वेळेवर दिला नाही तर कंपनी लॉक करणार Jio Phone Next 4G  

googlenewsNext

Jio Phone Next 4G खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. या फोनची किंमत 6499 रुपये आहे, परंतु त्याचबरोबर कंपनीने ईएमआयवर हा फोन विकत घेण्याचा पर्याय दिला आहे. त्यामुळे हा फोन फक्त 1,999 रुपयांच्या डाउन पेमेंटवर घरी नेता येईल. हा पर्याय खूप आकर्षक वाटतो आणि त्यामुळे अनेकांनी जियो फोन नेक्‍स्‍ट ईएमआयवर विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही देखील हा पर्याय निवडणार असाल तर ही बातमी संपूर्ण वाचा.  

जियोफोन नेक्‍स्‍टमध्ये डिवाइस लॉक इन्स्टॉल्ड आहे. जर फोनच्या ग्राहकाने फोनचा ईएमआय दिला नाही तर जियोकडे युजरचा अ‍ॅक्‍सेस बंद करण्याचा हक्क आहे, अशी माहिती गॅजेट 360 ने दिली आहे. हा फोन फक्त 1999 रुपये डाउन पेमेंट आणि 500 रुपयांच्या प्रोसेसिंग फीसह 18 ते 24 महिन्यांच्या ईएमआयवर विकत घेता येईल.  

जर ग्राहकांनी ईएमआय ऑप्शन्सची निवड केली आणि वेळेवर हप्ता दिला नाही, तर डिवाइस लॉकचे फिचर युजरचा अ‍ॅक्सेस बंद करेल. जियोने याची माहिती नोटि‍फि‍केशनच्या पॅनलवर दिली आहे, जिथे लॉकचा ऑप्‍शन हाइलाईट होतो. डिवाइस लॉकचे हे फीचर फक्त EMI वर खरेदी करण्यात आलेल्या जियोफोनवर असेल. पूर्ण रक्कम देणाऱ्या ग्राहकांना याची भीती बाळगण्याचे कारण नाही.  

बुडीत कर्ज कमी करण्यासाठी इतर फायनान्स कंपन्या देखील या फिचरचा वापर करतात. यात फायनान्स कंपन्या आणि प्रायव्हेट लेंडर्स त्यांच्याकडून घेतलेल्या फोन्समध्ये या पद्धतीचा अवलंब करतात. त्यामुळे असे करणारी जियो काही पहिली कंपनी नाही. परंतु जियोफोनमधील लॉक फिचर कंपनीने स्वतःहून निर्माण केले आहे.  

Web Title: Jio phone next device lock feature may lock phone of users upon non payment of jio phone emi  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.