32MP Selfie Camera, सुपरचार्ज टेक्नॉलॉजी आणि स्नॅपड्रॅगॉन प्रोसेसरसह Huawei Nova 9 लाँच; जाणून घ्या किंमत  

By सिद्धेश जाधव | Published: October 22, 2021 01:21 PM2021-10-22T13:21:48+5:302021-10-22T13:21:59+5:30

Huawei Nova 9 Price Specs: Huawei Nova 9 हा फोन Snapdragon 778G प्रोसेसर, 8GB RAM, 66W SuperCharge टेक्नॉलॉजी, 50MP रियर कॅमेरा आणि 32MP Selfie Camera सह सादर करण्यात आला आहे.

Huawei Nova 9 Launched Globally know Specs Price Sale details  | 32MP Selfie Camera, सुपरचार्ज टेक्नॉलॉजी आणि स्नॅपड्रॅगॉन प्रोसेसरसह Huawei Nova 9 लाँच; जाणून घ्या किंमत  

32MP Selfie Camera, सुपरचार्ज टेक्नॉलॉजी आणि स्नॅपड्रॅगॉन प्रोसेसरसह Huawei Nova 9 लाँच; जाणून घ्या किंमत  

Next

हुवावेने आंतरराष्ट्रीय बाजारात आपला नवीन मोबाईल फोन Huawei Nova 9 लाँच केला आहे. हा फोन Snapdragon 778G chipset, 8GB RAM, 66W SuperCharge टेक्नॉलॉजी, 50MP Rear camera आणि 32MP Selfie Camera सह सादर करण्यात आला आहे. कंपनीने हा फोन सध्या युरोपियन बाजारात सादर केला आहे. चला जाणून घेऊया या मोबाईलची सविस्तर माहिती.  

Huawei Nova 9 चे स्पेसिफिकेशन्स 

हा फोन अँड्रॉइड 11 वर आधारित ईएमयुआय 12 वर चालतो, परंतु यात गुगल मोबाईल सर्व्हिस मिळणार नाही. या फोनमधील डिस्प्ले फुल-एचडी+ रिजोल्यूशन, 19.5:9 अस्पेक्ट रेश्यो, 120Hz रिफ्रेश रेट आणि 300Hz टच सॅम्पलिंग रेटसह सादर करण्यात आले आहेत. Huawei Nova 9 मध्ये 6.57- इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे.  

या फोनला ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778G SoC, Adreno 642L GPU आणि 8GB RAM ची प्रोसेसिंग पॉवर मिळते. या हुवावे फोनमडील क्वॉड-रियर कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाईड सेन्सर, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे, जे एलईडी फ्लॅशसह येतात. हुवाय नोवा 9 च्या फ्रंटला 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो.  

कनेक्टिविटीसाठी डिवाइसमध्ये 4G LTE, वाय-फाय 6, ब्लूटूथ v5.2, GPS/ A-GPS, NFC आणि एक USB टाइप-C पोर्टचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर अ‍ॅक्सेलेरोमीटर, अ‍ॅम्बिएंट लाईट, जायरोस्कोप, मॅग्नेटोमीटर आणि एक प्रॉक्सिमिटी सेन्सर देखील देण्यात आले आहेत. सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरची मदत घेण्यात आली आहे. पॉवरबॅकअपसाठी यात 4,300mAh च्या बॅटरी देण्यात आली आहे जी 66W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.  

Huawei Nova 9 की किंमत 

हुवावे नोवा 9 युरोपियन बाजारात 499 युरोमध्ये सादर करण्यात आला आहे. ही किंमत 43,400 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. हा फोन भारतात येईल कि नाही हे मात्र अजूनही स्पष्ट झालेले नाही.  

Web Title: Huawei Nova 9 Launched Globally know Specs Price Sale details 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.