स्मार्टफोनमधील कॉन्टॅक्ट्स फेसबुकवरही अपलोड आहेत का?; असे करा डिलीट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 03:38 PM2019-08-13T15:38:49+5:302019-08-13T15:40:40+5:30

संवाद साधण्याठी फेसबुकचा वापर केला जातो. सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म फेसबुक आपल्या युजर्ससाठी नवनवीन अपडेट आणत असतं

this is how you can delete smartphone contacts uploaded on facebook | स्मार्टफोनमधील कॉन्टॅक्ट्स फेसबुकवरही अपलोड आहेत का?; असे करा डिलीट

स्मार्टफोनमधील कॉन्टॅक्ट्स फेसबुकवरही अपलोड आहेत का?; असे करा डिलीट

Next
ठळक मुद्दे संवाद साधण्याठी फेसबुकचा वापर केला जातो.फेसबुकवर युजर्स अनेकदा पर्सनल गोष्टींची माहिती देत असतात. फेसबुक युजर्सच्या स्मार्टफोनमध्ये सेव्ह असलेले सर्व कॉन्टॅक्ट्स आपल्या वेबसाईटवर सेव्ह करतं.

नवी दिल्ली - संवाद साधण्याठी फेसबुकचा वापर केला जातो. सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म फेसबुक आपल्या युजर्ससाठी नवनवीन अपडेट आणत असतं. मात्र फेसबुक युजर्सचा डेटा लीक झाल्याच्या घटना समोर आल्यामुळे सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. युजर्सच्या डेटाचा वापर चुकीच्या गोष्टींसाठी केला जाण्याची शक्यता ही अधिक असते. 

फेसबुकवर युजर्स अनेकदा पर्सनल गोष्टींची माहिती देत असतात. मात्र डेटा लीक प्रकरणामुळे युजर्सनी सावध राहणं गरजेचं आहे. फेसबुकवर देण्यात आलेला पर्सनल डेटा ही डिलीट होतो. फेसबुक युजर्सच्या स्मार्टफोनमध्ये सेव्ह असलेले सर्व कॉन्टॅक्ट्स आपल्या वेबसाईटवर सेव्ह करतं हे फार कमी लोकांना माहीत आहे. यासाठी युजर्सची परवानगी मागितली जाते. मात्र युजर्स नीट न वाचता ओके वर क्लिक करतात.

फेसबुकवरील कॉन्टॅक्ट्स असे करा डिलीट

 - सर्वप्रथम आपल्या डेस्कटॉपवर ब्राऊजर ओपन करा.

- https://www.facebook.com/mobile/facebook/contacts/ वर जा.

- फेसबुक अकाऊंटवर लॉग इन करा.

- वेब पेज ओपन झाल्यावर Contacts, Calls and Text History and Invitations Sent हे तीन टॅब दिसतील. 

- तिन्ही पर्यायाखाली देण्यात आलेल्या 'Delete All' पर्यायावर क्लिक करा. 

- क्लिक करून एकदा कन्फर्म करा. त्यानंतर परत डिलीटवर क्लिक करा.

या स्टेप्स फॉलो केल्यानंतर फेसबुक एक युजर्सना एक मेसेज दाखवेल. कॉन्टॅक्ट्स डिलीट करण्यात आल्याची युजर्सची रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट केली असल्याचा मेसेज येईल. कॉन्टॅक्ट्स डिलीट झाल्यानंतर काही मिनिटांनी एक नोटिफिकेशन पाठवण्यात येईल.

this is how you can create friends lists on facebook and how it will benefit you | चॅटिंगची गंमत वाढवणारं फेसबुकचं

चॅटिंगची गंमत वाढवणारं फेसबुकचं 'हे' फीचर माहीत आहे का?

फेसबुकवर अनेक फीचर आहेत मात्र फारच कमी युजर्सना याची माहिती आहे. फेसबुकवर फ्रेंड्स लिस्ट नावाचं एक फीचर असून या फीचरच्या मदतीने युजर्स आपल्याला हवी तशी नवी फ्रेंड लिस्ट तयार करू शकतात. फेसबुकवर वेगवेगळी फ्रेंड लिस्ट तयार करण्याचा पर्याय मिळते असल्याने हे फीचर युजर्ससाठी फायदेशीर आहे. युजर्सना त्यांच्या आवडीची फ्रेंड लिस्ट तयार करता येणार असल्याने चॅटिंगची गंमत वाढवणार आहे. फेसबुकवर सर्वांना एकाच फ्रेंड लिस्टमध्ये ठेवण्याऐवजी फॅमिली, क्लोज फ्रेंड, स्कूल फ्रेंड, कॉलेज फ्रेंड, ऑफिस अशा वेगवेगळ्या लिस्ट तयार करता येतात. फेसबुकवर अनेक गोष्टी शेअर केल्या जातात. मात्र त्यापैकी काही फोटो हे फक्त आपल्याला हव्या असलेल्या व्यक्तींसोबत शेअर करायचे असतात. त्यामुळे अशावेळी फ्रेंड लिस्ट फीचरचा खूप उपयोग होणार आहे. फेसबुकवर आधी पोस्ट शेअर करताना पब्लिक, फ्रेंड्स किंवा ओन्ली मीचा पर्याय असायचा. यापुढे या नव्या फिचरमुळे युजर्सना आपल्या पोस्ट फ्रेंड लिस्टप्रमाणे योग्य आणि आपल्याला हव्या असलेल्या लोकांसोबत शेअर करता येतील. 

facebook will now prioritise your close friends on your news feed | Facebook वर नवीन फीचर येणार, फेव्हरेट फ्रेंड टॉपवर राहणार

Facebook युजर्सना घरबसल्या पैसे कमवण्याची संधी, जाणून घ्या कसं

फेसबुकने युजर्सना घरबसल्या पैसे कमवण्याची संधी दिली आहे. मात्र यासाठी युजर्सना एक अ‍ॅप डाऊनलोड करावं लागणार आहे. फेसबुकने एक नवं रिसर्च अ‍ॅप आणलं आहे. 'स्टडी' असं या रिसर्च अ‍ॅपचं नाव असून फेसबुकने मंगळवारी (12 जून) याबाबत घोषणा केली. हे अ‍ॅप युजरचा फोन ट्रॅक करणार आहे.  अ‍ॅप डाऊनलोड करताना युजर्सला त्यांच्या फोनमधील विविध अ‍ॅपचा ते किती वापर करता याची माहिती गोळा करण्याची परवानगी संबंधित रिसर्च अ‍ॅपला द्यावी लागणार आहे. यानंतर हे अ‍ॅप युजर्सच्या फोनला ट्रॅक करुन कोण कोणते अ‍ॅप किती वेळ वापरतो याची माहिती संकलित करणार आहे. फोन ट्रॅक करण्याची परवानगी देणाऱ्या युजर्सना फेसबुक पैसे देणार आहे. मात्र संबंधित अ‍ॅप केवळ 18 वर्षांपेक्षा  जास्त वय असलेले युजर्सच डाऊनलोड करू शकतात.

 

Web Title: this is how you can delete smartphone contacts uploaded on facebook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.