अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये सेव्ह केलेला वाय-फाय पासवर्ड कसा बघायचा? जाणून घ्या पद्धत

By सिद्धेश जाधव | Published: December 8, 2021 08:00 PM2021-12-08T20:00:48+5:302021-12-09T13:45:57+5:30

How to View Saved Wi-Fi Passwords on Android: तुम्हालाही तुमच्या अँड्रॉइड फोनमध्ये सेव्ह केलेला वायफाय पासवर्ड बघायचा आहे का मग पुढे दिलेल्या पद्धतींचा वापर करा.  

How to View Saved Wi-Fi Passwords on Android in marathi | अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये सेव्ह केलेला वाय-फाय पासवर्ड कसा बघायचा? जाणून घ्या पद्धत

अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये सेव्ह केलेला वाय-फाय पासवर्ड कसा बघायचा? जाणून घ्या पद्धत

googlenewsNext

तुमच्या अँड्रॉइड फोनमधील सेवा केलेला Wi-Fi password कसा बघायचा हे माहित आहे का तुम्हाला? कधीकधी आपण आपल्याच नेटवर्कचा पासवर्ड विसरतो किंवा मित्राच्या ज्या नेटवर्कला तुम्ही कनेक्टड आहात त्याचा पासवर्ड वापरून दुसरं डिवाइस कनेक्ट करायचं असेल तर काय करावं? कारण कोणतंही असो आम्ही तुम्हाला काही पद्धती सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीनं तुम्ही तुमच्या Android फोनमधील सेव्ह केलेल्या वाय-फायचा पासवर्ड मिळू शकता.  

How to See Wi-Fi Passwords on Android Without Root in Marathi 

Android 10 किंवा त्यावरील डिव्हाइसेसवर फोन रूट न करता देखील सहज Wi-Fi password मिळवता येतो. चला जाणून घेऊया याची पद्धत.  

  • सर्वप्रथम Settings मध्ये जा  
  • त्यानंतर Network & internet वर क्लीक करा  
  • इथे Wi-Fi वर क्लीक करा  
  • इथे असलेल्या यादीत सर्वात वर तुम्ही आता कनेक्टड असलेलं Wi-Fi नेटवर्क असेल, त्याची किंवा तुम्हाला हव्या असलेल्या जुन्या नेटवर्कची निवड करा.  
  • या पेजवर शेयर बटनवर क्लीक करा. आता तुम्हाला फोनचा पासवर्ड किंवा पिन टाकावा लागेल. म्हणजे एका क्यूआर कोडच्या खाली त्या वाय-फायचा पासवर्ड दिसेल.  
  • जर वाय-फाय पासवर्ड दिसला नाही तर तुम्ही आलेला QR कोड स्कॅन करून देखील नवीन डिवाइस कनेक्ट करू शकता.  

How to See Wi-Fi Passwords on Android 9 and Older in Marathi

जर तुमच्याकडे Android 9 किंवा त्यापेक्षा जुना डिवाइस असेल तर वरील पद्धत वापरता येणार नाही. यासाठी फोन रूट करावा लागेल. त्यानंतर फाईल एक्सप्लोरर अ‍ॅपचा वापर करून /data/misc/wifi या फोल्डरमध्ये जावं लागेल. इथे Open wpa_supplicant.conf फाईलमध्ये आतापर्यंतचे सर्व वाय-फायची नावं (ssid) आणि पासवर्ड (psk) दिसतील.  

Web Title: How to View Saved Wi-Fi Passwords on Android in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.