PF रेकॉर्डमध्ये जन्मतारीख चुकली? तर डोंट वरी; जाणून घ्या, घरबसल्या DOB बदलण्याची ऑनलाइन पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 06:38 PM2021-10-18T18:38:10+5:302021-10-18T18:39:46+5:30

PF अकाउंटच्या रोकॉर्डमध्ये काही चूक झाल्यास आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अनेक प्रकरणांमध्ये तर पीएफ रेकॉर्डमध्ये लोकांची जन्मतारीख चुकल्याचे दिसून आले आहे. यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

How to update wrong date of birth in PF account from smartphone at home | PF रेकॉर्डमध्ये जन्मतारीख चुकली? तर डोंट वरी; जाणून घ्या, घरबसल्या DOB बदलण्याची ऑनलाइन पद्धत

PF रेकॉर्डमध्ये जन्मतारीख चुकली? तर डोंट वरी; जाणून घ्या, घरबसल्या DOB बदलण्याची ऑनलाइन पद्धत

googlenewsNext

आपल्या सर्वांनाच माहित आहे, की नोकरी करणाऱ्या लोकांसाठी पीएफ अकाउंट हे अत्यंत महत्वाचे आहे. साधारणपणे नोकरी करणाऱ्या सर्वच लोकांच्या पगारातून पीएफ अर्थात भविष्य निर्वाह निधीअंतर्गत एक विशिष्ट रक्कम कापली जाते. यात एक भाग कंपनीचा आणि दुसरा भाग कर्मचाऱ्यांचा असतो. 

अशा या PF अकाउंटच्या रोकॉर्डमध्ये काही चूक झाल्यास आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अनेक प्रकरणांमध्ये तर पीएफ रेकॉर्डमध्ये लोकांची जन्मतारीख चुकल्याचे दिसून आले आहे. यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. (How To Update Wrong DOB In PF Account)

आपल्यासोबतही असेच काही घडले असेल, तर आम्ही आपल्याला एका सोप्या प्रक्रियेसंदर्भात माहिती देणार आहोत. या माध्यमाने आपण, घर बसल्या आपल्या स्मार्टफोनच्या सहाय्याने PF रिकॉर्ड्समध्ये आपली डेट ऑफ बर्थ व्यवस्थित करू शकता. तर जाणून घेऊया यासंदर्भातली संपूर्ण प्रक्रिया.

PF रिकॉर्डवरील डेट ऑफ बर्थ अशी करा बरोबर -
- PF रिकॉर्डवरील अपनी डेट ऑफ बर्थ बरोबर करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम सोबत देण्यात आलेल्या वेबसाइटवर जावे लागेल. https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/
- यानंतर आपल्याला आपला UAN नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोडही  टाकावा लागेल.
- यानंतर एक नवे पेज ओपन होईल. यात आपल्याला काही पर्याय दिसतील. यांपैकी आपल्याला Manage टॅबवर क्लिक करावे लागेल.
- यानंतर आपल्याला Modify Basic Details ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
- यानंतर आपल्याला काही पर्याय दिले जातील. यात आपल्याला आपले नाव आणि आपली योग्य जन्म तारीख टाकावी लागेल. 
- नंतर, खाली दिलेल्या कॉलममध्ये आपल्याला टीक करावे लागेल. ज्यात 'I hereby consent to provide my Aadhaar Number, Biometric and/or One Time Pin (OTP) data for Aadhaar based authentication for the purpose of establishing my identity and seeding it with UAN', असे लिहिलेले असेल.
- यानंतर खाली देण्यात आलेल्या Update बटनवर टॅप करा.
- यानंतर आपली ही माहिती आपल्या एंप्लॉयरकडे अप्रूव्ह होण्यासाठी जाईल.
- आपल्या एंप्लॉयरने हे अप्रूव्ह केल्यानंतर, आपली जन्म तारीख PF रिकॉर्डमध्ये बदलली जाईल.


 

Web Title: How to update wrong date of birth in PF account from smartphone at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.