'या' आयफोन मॉडेल्सना सर्वप्रथम मिळेल iOS 15 चा अपडेट; अश्याप्रकारे करता येईल डाउनलोड 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 03:21 PM2021-06-08T15:21:51+5:302021-06-08T15:22:43+5:30

iOS 15 Update: Apple ने iOS 15 चा अपडेट आणला आहे, हा अपडेट डाउनलोड करण्यासाठी पुढील प्रक्रिया करा.  

How to Update iOS 15 in Apple iPhone  | 'या' आयफोन मॉडेल्सना सर्वप्रथम मिळेल iOS 15 चा अपडेट; अश्याप्रकारे करता येईल डाउनलोड 

'या' आयफोन मॉडेल्सना सर्वप्रथम मिळेल iOS 15 चा अपडेट; अश्याप्रकारे करता येईल डाउनलोड 

Next

Apple ची वार्षिक वर्ल्डवाइड डिवेलपर्स कॉन्फ्रेंस काळ रात्रीपासून सुरु झाली आहे. WWDC 2021 म्हणजे Apple Worldwide Developers Conference पाच दिवस म्हणजे 11 जून पर्यंत सुरु राहील. या इव्हेंटमध्ये नवीन ऑपरेटिंग सिस्टम iOS 15 लाँच केली गेली आहे. या अपडेटमध्ये शानदार आणि अ‍ॅडव्हान्स फीचर्स आले आहेत. नवीन आयओएस 15 कोणत्या कोणत्या आयफोन्समध्ये उपलब्ध होईल याची एक यादी कंपनीने जाहीर केली आहे.  

या Apple iPhones आणि iPod ला मिळेल iOS 15 चा अपडेट 

iPhone 12 Pro Max 

iPhone 12 Pro 

iPhone 12 

iPhone 12 Mini 

iPhone 11 Pro Max 

iPhone 11 Pro 

iPhone 11 

iPhone XS Max 

iPhone XS 

iPhone XR 

iPhone X 

iPhone 8 Plus 

iPhone 8 

iPhone 7 Plus 

iPhone 7 

iPhone 6S Plus 

iPhone 6S 

iPhone SE (first and second generation) 

iPod Touch (seventh generation) 

iPhones मध्ये iOS 15 अपडेट करण्यासाठी पुढील प्रक्रिया करा  

Apple ने सध्या iOS 15 चा developer beta वर्जन जारी केला आहे. त्यामुळे मर्यादित लोकांना हा फोनमध्ये इन्स्टाल आणि डाउनलोड करता येईल. iOS 15 public beta वर्जन जुलैमध्ये सादर केला जाईल. कंपनी iOS 15 येत्या काही महिन्यांमध्ये रोलआउट करेल.  Apple iPhone युजर्सना iOS 15 येत्या काही दिवसांत डाउनलोडसाठी उपलब्ध होईल. 

  1. तुमचा फोन आयओएस 15 वर अपडेट होईल कि नाही हे जाणून घेण्यासाठी iPhones च्या Settings अ‍ॅपमध्ये जा. 
  2. सेटिंग्समध्ये जाऊन General टॅब क्लिक करा. 
  3. जनरल टॅबमध्ये Software Update चा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा. 
  4. iOS 15 जर तुमच्या आयफोनमध्ये डाउनलोडसाठी उपलब्ध झाला आहे असेल तर Download and Install ऑप्शन दिसेल. 
  5. आतापर्यंत तुमच्या iPhone मध्ये आयओएस 15 चा अपडेट आला नसेल तर तिथे UP-to-Date लिहून येईल आणि तुम्हाला काही दिवसानंतर चेक करावे लागेल.  

Apple iPhone मध्ये iOS 15 डाउनलोड आणि इन्स्टाल करण्यासाठी जवळपास 3 जीबीची स्टोरेज स्पेस रिकामी असणे आवश्यक आहे.

Web Title: How to Update iOS 15 in Apple iPhone 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.