अपघातांपासून वाचायचे असेल तर Google Maps मधील ‘ही’ सेटिंग आताच ऑन करा  

By सिद्धेश जाधव | Published: September 14, 2021 05:28 PM2021-09-14T17:28:46+5:302021-09-14T17:29:26+5:30

Google Maps मधील स्पीड लिमिट सेटिंग तुम्हाला ओव्हरस्पीड ड्रायव्हिंग करण्यापासुन रोखते. जाणून घ्या कशी ऑन करायची ही सेटिंग.  

how to turn on speed limit warning on Google maps   | अपघातांपासून वाचायचे असेल तर Google Maps मधील ‘ही’ सेटिंग आताच ऑन करा  

प्रतीकात्मक फोटो

googlenewsNext

Google Maps मधील स्पीड लिमिट फंक्शन युजर्सना ते जात असलेल्या रस्त्याची वेग मर्यादा दाखवतो. जर त्यांनी ती मर्यादा ओलांडली तर त्यांना नोटिफिकेशन देखील पाठवली जाते. तसे पाहता प्रत्येक ड्रायव्हरला आपला वेग किती आहे हे माहित असते. यासाठी वाहनात स्पीडोमीटर असतो, जो वाहनाचा वेग दर्शवतो. तसेच गुगल मॅपवरील स्पीडोमीटर अचूक नाही हे स्वतः गुगलने मान्य केले आहे. परंतु या सेटिंगच्या मदतीने तुम्हाला त्या ठराविक रस्त्याची वेगमर्यादा समजेल आणि चुकून तुम्ही ती मर्यादा ओलांडली तर गुगल मॅप तुम्हाला नोटिफिकेशनच्या माध्यमातून सांगेल.  

जेव्हा तुम्ही गुगल मॅप वापरून नेव्हिगेट करता तेव्हा देखील मॅपवर तुमचा वेग दर्शवला जात असतो. याची सुरवात 2019 मध्ये करण्यात आली होती. सुरवातीला हे फिचर फक्त आशिया, युरोप, दक्षिण अमेरिका, यूके आणि यूएसमध्ये उपलब्ध होते. आता या फिचरचा प्रसार होऊ लागला आहे. स्पीड लिमिट फंक्शन देखील सध्या सगळीकडे उपलब्ध झालेले नाही. जर तुमच्या भागात स्पीड लिमिट फंक्शन उपलब्ध असेल तर तुम्ही पुढील स्टेप्स फॉलो करून ते अ‍ॅक्टिव्हेट करू शकता.  

गुगल मॅपमधील स्पीड लिमिट फंक्शन कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे?  

Google Maps मध्ये स्पीड लिमिट मॅपच्या खालच्या बाजूस डाव्या कोपऱ्यात दिसते. पुढील स्टेप्स फॉलो करून तुम्ही अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये स्पीड लिमिट अ‍ॅक्टिव्हेट करू शकता: 

  • Google Maps ओपन करा.  
  • वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात प्रोफाईल पिक्चरवर क्लिक करा. 
  • Settings मध्ये जा.  
  • Navigation Settings पर्यंत स्क्रॉल डाउन करा.  
  • Speed Limits setting मध्ये जाऊन ते On/Off  मधून निवडा.  

सूचना: गुगल मॅपने युजर्सना हे फिचर वापरताना वाहनाच्या स्पीडोमीटरवर देखील लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे.  

Web Title: how to turn on speed limit warning on Google maps  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.