Windows लॅपटॉप हरवल्यास कसा शोधायचा आणि लॉक करायचा? जाणून घ्या  

By सिद्धेश जाधव | Published: October 16, 2021 06:36 PM2021-10-16T18:36:36+5:302021-10-16T18:37:37+5:30

How To Use Find My Device Feature on Windows: Windows Laptop मध्ये देखील अँड्रॉइड आणि आयओएस प्रमाणे Find My Device फिचर असते. या लेखात आपण त्या फिचरची माहिती घेणार आहोत.  

How to locate windows laptop and lock them by using find my device feature like android and ios device  | Windows लॅपटॉप हरवल्यास कसा शोधायचा आणि लॉक करायचा? जाणून घ्या  

(फोटो सौजन्य: pcmag.com)

Next

वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन क्लासेसमुळे दैनंदिन जीवन बदलून गेलं आहे. स्मार्टफोन इतकाच वेळ आता लॅपटॉपवर घालवला जात आहे. लॅपटॉप फोन्सपेक्षा महाग असतात त्यामुळे ते हरवल्यास मोठे नुकसान होऊ शकते. परंतु तुम्हाला माहित आहे का अँड्रॉइड आणि iOS डिवाइस प्रमाणे Windows लॅपटॉपमध्ये देखील Find My Device ची सुविधा देण्यात आली आहे. आज आपण Microsoft च्या Windows लॅपटॉपमधील Find My Device फीचरची माहिती घेणार आहोत.  

स्मार्टफोन शोधणे सोप्पे असते कारण त्यात टेलीकॉम आणि WiFi अशा दोन नेटवर्कची कनेक्टिव्हिटी असते. परंतु लॅपटॉपवर फक्त वायफायचा आधार घेता येतो, त्यामुळे हे डिवाइस शोधणे कठीण असते. अशावेळी मायक्रोसॉफ्टचे Find My Device फीचरची मदत घेता येते. पुढे आपण हे फीचर कसे इनेबल करायचे ते जाणून घेणार आहोत.  

Windows लॅपटॉपमध्ये अशाप्रकारे इनेबल हे फीचर 

Windows लॅपटॉपमध्ये Find My Device फीचर इनेबल करण्यासाठी लोकेशन सर्विसेज इनेबल असणे, इंटरनेट चांगला कनेक्शन, Windows PC मायक्रोसॉफ्ट अकॉउंटशी लिंक असणे आवश्यक आहे. शाळेतुन मिळलेल्या आणि वर्क अकॉउंट युजर्सना हे फिचर वापरता येत नाही.  जर तुम्ही डिवाइस सेटअप करताना हे फीचर इनेबल केले नसेल तर तुम्ही सेटिंगमध्ये जाऊन ते करू शकता  

  • यासाठी सर्वप्रथम लॅपटॉप सेटिंग मध्ये जा. 
  • त्यानंतर Update and Security मध्ये जाऊन Find My Device ऑप्शन वर क्लिक करा. 
  • त्यानतंर हे फीचर इनेबल करा. 
  • तुमचा डिवाइस शोधण्यासाठी https://account.microsoft.com/devices ओपन करा आणि तुमच्या मायक्रोसॉफ्ट अकॉउंटने लॉग इन करा. 
  • त्यानंतर Find My Device या पर्यायाची निवड करा. 
  • त्यानंतर जो डिवाइस शोधत आहात त्याची निवड करा म्हणजे तुम्हाला मॅपवर लोकेशन दिसेल.  
  • Lock पर्याय निवडून तुम्ही तो डिवाइस लॉक देखील करू शकता. म्हणजे तुमच्या डेटाचा गैरफायदा घेतला जाणार नाही.  

Web Title: How to locate windows laptop and lock them by using find my device feature like android and ios device 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.