तुमचा आधार कार्ड खरा आहे कि खोटा? अशाप्रकारे घर बसल्या तपासा सत्यता  

By सिद्धेश जाधव | Published: July 26, 2021 07:18 PM2021-07-26T19:18:23+5:302021-07-26T19:19:15+5:30

Aadhar Card Authencity: अगदी सोप्प्या पद्धतीने कोणाच्याही Aadhaar Card ची सत्यता तपासात येते. यासाठी कोणत्याही कार्यलयात जाण्याची गरज नाही.

How to check aadhaar card authenticity and validity simple process   | तुमचा आधार कार्ड खरा आहे कि खोटा? अशाप्रकारे घर बसल्या तपासा सत्यता  

तुमचा आधार कार्ड खरा आहे कि खोटा? अशाप्रकारे घर बसल्या तपासा सत्यता  

Next

हल्ली Aadhaar Card विना कोणतेही सरकारी काम होणे कठीण आहे. त्यामुळे आधार कार्डचे महत्व दिवसेंदिवस वाढत जात आहे. अश्यावेळी काही लोक कुठूनही आधार कार्ड काढून घेतात. अधिकृत आधार कार्ड केंद्रावरून कार्ड काढून न घेतल्यास तुमची फसवणूक होऊ शकते आणि नकली अदाहर कार्ड तुमच्या हातात पडू शकते. या पासून वाचण्यासाठी तुम्ही आधार कार्डची वैधता आणि सत्यता तपासून बघू शकता. यासाठी कुठल्याही कार्यलयात रांगा लावण्याची देखील गरज नाही. तुम्ही घर बसल्या ऑनलाईन तुमचे आधार कार्ड नकली आहे कि नाही ते बघू शकता.  

Aadhaar Card ची सत्यता अशी तपासा  

  • Aadhaar Card ची सत्यता जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या ब्राउजरमध्ये http://resident.uidai.gov.in/verify ओपन करा. 
  • त्यानंतर स्क्रीनवरील बॉक्समध्ये ज्या आधार कार्ड नंबरची सत्यता तपासायची आहे तो नंबर टाका.  
  • त्यानंतर Captcha Code एंटर करा. 
  • आता खाली दिलेल्या Proceed To Verify बटनवर क्लिक करा. 
  • असे करताच स्क्रीनवर या नंबरचा आधार कार्ड अस्तित्वात आहे कि नाही हे लिहून येईल.  

विशेष म्हणजे इथे आधार कार्ड नकली आहे कि नाही इतकेच समजते. आधार कार्ड कोणाच्या नाववर आहे, याची माहिती मिळत नाही. फक्त लिंग, राज्य आणि मोबाईल नंबरचे शेवटचे तीन अंक देखील दिसतील. ही माहिती दिसल्यास तुम्ही सबमिट केलेला आधार कार्ड नंबर खरा आहे, असे समजायचे.  

Web Title: How to check aadhaar card authenticity and validity simple process  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.