दमदार कॅमेऱ्यांचा Honor 8C आला...तोही परवडणाऱ्या किमतीत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 06:20 PM2018-12-24T18:20:43+5:302018-12-26T12:09:10+5:30

Honor 8C मध्ये पाठीमागे ड्युअल कॅमेरा पहिला 13 मेगापिक्सल f/1.8 अपार्चर आणि दुसरा 2 मेगापिक्सल f/2.4 सेन्सरसह देण्यात आला आहे.

honor 8c with powerful cameras and 4ooo mah battery | दमदार कॅमेऱ्यांचा Honor 8C आला...तोही परवडणाऱ्या किमतीत

दमदार कॅमेऱ्यांचा Honor 8C आला...तोही परवडणाऱ्या किमतीत

Next

हॉनरचे स्माटफोन प्रामुख्याने ड्युअल रिअर कॅमेरासाठी ओळखले जातात. यंदा कंपनीने AI कॅमेरा तंत्रज्ञान असलेले फोन लाँच केले आहेत. गेल्या महिन्यात जबरदस्त स्मार्टफोन Honor 8X लाँच केला होता. यानंतर हॉनरने Honor 8C हा परवडणारा स्मार्टफोन लाँच केला. चला Honor 8C मध्ये काय खास आहे ते पाहू.

Honor 8C मध्ये 4000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे, जी जवळपास दोन दिवस फोन चार्ज ठेवते. याशिवाय फोनमध्ये 720 पिक्सलची स्क्रीन देण्यात आली आहे. हा डिस्प्ले बॅटरी लवकर संपण्यापासून वाचवितो. तसेच फास्ट चार्जिंगसाठी क्वीक चार्ज 3.0 ही प्रणाली वापरण्यात आली आहे.
 
हॉनर हा ह्युवाईचा सबब्रँड आहे. यामुळे या फोनना Hisilicon Kirin या सहकारी कंपनीचा दमदार प्रोसेसर मिळतो. मात्र, या फोनमध्ये पहिल्यांदाच Qualcomm Snapdragon 632 हा प्रोसेसर देण्यात आला आहे. हा प्रोसेसर 1.8 गीगाहर्ट्झचा आहे. याशिवाय फोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 32 किंवा 64GB चे स्टोरेज देण्यात आले आहे. शिवाय मायक्रोएसडी कार्डही बसवू शकतो. 



हॉनरच्या या 8सी या फोनमध्ये ‘Do Not Disturb’ मोडही देण्यात आला आहे. हे फिचर तुम्ही गेम खेळत असताना सुरु ठेवल्यास नोटिफिकेशन, कॉलमुळे व्यत्यय येत नाही. तसेच या फोनमध्ये EMUI 8.2 ही ऑपरेटिंग सिस्टिम अँड्रॉईड 8.1 ओरियो या ओएसवर देण्यात आली आहे. ब्युटूथ ब्रिज फिचरमुळे एकाचवेळी दोन ब्ल्यूटूथ डिव्हाईसेसना फोन जोडता येतो. 

Honor 8C मध्ये पाठीमागे ड्युअल कॅमेरा पहिला 13 मेगापिक्सल f/1.8 अपार्चर आणि दुसरा 2 मेगापिक्सल f/2.4 सेन्सरसह देण्यात आला आहे. एआय सेन्सरमुळे हा कॅमेरा 22 प्रकारचे सीन कॅप्चर करू शकतो. पुढच्या बाजुला सेल्फीसाठी 8 मेगापिक्सल कॅमेरा LED फ्लॅशसह देण्यात आला आहे. यामुळे कमी प्रकाशात फोन चांगले सेल्फी काढू शकतो. 

पाठीमागे फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला असून बॉडी मेटल आणि ग्लास अशी मिश्र आहे. फोनचा डिस्प्ले आयपीएस पॅनेलचा 6.26 इंचाचा आहे. याचे रिझोल्युशन 1,520 x 720 पिक्सल आहे. तसेच डोळ्यांना त्रास न होण्यासाठी आय कंफर्ट मोडही देण्यात आला आहे. 

Honor 8C या परवडणाऱ्या फोनची विक्री 10 डिसेंबरला सुरु होणार असून अॅमेझॉनवर उपलब्द असणार आहे.

4 + 32 जीबी रॅमच्या मॉडेलची किंमत 11,999 आणि 4 + 64 जीबी रॅमची किंमत 12,999 रुपये असणार आहे.

Web Title: honor 8c with powerful cameras and 4ooo mah battery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.