गुगल तुमचे लोकेशनच नाही तर हृदयाचे ठोकेही चेक करणार, कॅमेरामध्ये भन्नाट फिचर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2021 02:46 PM2021-02-05T14:46:28+5:302021-02-05T14:47:51+5:30

Google will check Heart rate : Google ला सगळे माहिती असते म्हणतात. खरेही आहे ते. महिन्याच्या शेवटी तुम्ही कुठे कुठे फिरलात, कोणत्या ठिकाणी किती वेळ घालवला आदीचा एक रिपोर्ट येतो. म्हणजेच गुगलला तुम्ही आत्ता या क्षणाला कुठे आहात ते माहिती असते...

Google will check your heart rate in google fit app by smartphone Camera | गुगल तुमचे लोकेशनच नाही तर हृदयाचे ठोकेही चेक करणार, कॅमेरामध्ये भन्नाट फिचर

गुगल तुमचे लोकेशनच नाही तर हृदयाचे ठोकेही चेक करणार, कॅमेरामध्ये भन्नाट फिचर

Next

Google ला सगळे माहिती असते म्हणतात. खरेही आहे ते. महिन्याच्या शेवटी तुम्ही कुठे कुठे फिरलात, कोणत्या ठिकाणी किती वेळ घालवला आदीचा एक रिपोर्ट येतो. म्हणजेच गुगलला तुम्ही आत्ता या क्षणाला कुठे आहात ते माहिती असते. आता गुगल तुमच्या हृदयाचे ठोकेदेखील मोजणार आहे. गुगलने पिक्सल स्मार्टफोनमधील गुगल फिट अॅपमध्ये नवीन हार्ट रेट आणि रेस्टिरेटरी मॉनिटर देण्याची घोषणा केली आहे. हे फिचर या महिन्याच्या अखेरीस जारी केले जाण्याची शक्यता असून कंपनीने याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. (google will moniter user's heart rates in Pixel Smartphone).


गुगल पिक्सल डिव्हाईससाठी पुढील काही दिवसांत हे फिचर काम करणार आहे. कॅमेराच्या मदतीने युजरचा हार्ट रेट मॉनिटर केला जाणार आहे. यासाठी फिंगरटिप्सद्वारे रक्तातील रंग बदलाव ट्रॅक केले जाणार आहेत. दुसरीकडे रेस्पिरेटरी मॉनिटर युजरच्या छातीतील धडधड ट्रॅक करणार आहे. 


कंपनीच्या एका हेल्थ प्रॉडक्ट मॅनेजरने सांगितले की, डॉक्टर देखील एखाद्या रुग्णाचा श्वासोच्छवासादरम्यान रेस्पिरेटरी रेट छाती वर येणे आणि खाली जाणे या क्रियेद्वारे तपासतात. गुगलचा रेस्परेटरी मॉनिटरदेखील याच प्रकारे काम करणार आहे. कंपनीने सांगितले की, हे फिचर अशासाठी दिले जाणार आहे कारण याद्वारे य़ुजरला त्याच्या आरोग्याची माहिती मिळत जाईल. मात्र, हे मॉनिटर युजरच्या मेडिकल कंडिशनचा अंदाजा लावू शकणार नाहीत. यामुळे याचा वापर वैद्यकीय वापरासाठी होण्याची शक्यता कंपनीने नाकारली आहे. 


सॅमसंगमध्ये हे फिचर...
गुगलच्या पिक्सल फोनमध्ये येत असलेला हार्ट रेट मॉनिटर जवळपास सॅमसंगच्या गॅलेक्सी S10 सारख्या काही डिव्हाईसमध्ये मिळत असलेल्या फिचरसारखा काम करणार आहे. सॅमसंगने हे फिचर गॅलेक्सी S10e, Galaxy S20 सिरीज आणि यानंतर लाँच झालेल्या स्मार्टफोनमधून काढून टाकले आहे. 

येथून उजवीकडे वळा...! Google Maps आता मराठीतून सांगणार रस्ता

भारतात रस्ता शोधण्यासाठी किंवा एखाद्या वेळी रस्ता चुकल्यावर सर्रासपणे गुगल मॅपचा वापर केला जातो. गुगल मॅप वापरणाऱ्या युझर्सची संख्या भारतात कोट्यवधीच्या घरात आहे. मात्र, इंग्रजीचे ज्ञान नसणाऱ्यांसाठी गुगल मॅप्सने मोठी सोय केली आहे. कारण, युझर्सच्या आवश्यकतांनुसार गुगल मॅप्समध्ये बदल करण्याचा निर्णय कंपनीकडून घेण्यात आला आहे. 

गुगल मॅप्सची सेवा आता मराठी भाषेतही उपलब्ध होणार आहे. यासंदर्भातील एक घोषणा अलीकडेच करण्यात आली. गुगल मॅप्समध्ये १० भारतीय भाषांना सपोर्ट करणारी ऑटोमेटिक ट्रान्सलिट्रेशन सिस्टिम सुरू करण्यात येणार आहे. स्थानिक भाषेत गुगल मॅप्सची सेवा सुरू झाल्यामुळे इंग्रजी न समजणाऱ्या युझर्सनाही एखादा पत्ता शोधताना अडचणींचा सामना करावा लागणार नाही.

Web Title: Google will check your heart rate in google fit app by smartphone Camera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.