'www'ला 30 वर्षं पूर्ण! गुगलनं बनवलं खास डुडल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 09:30 AM2019-03-12T09:30:59+5:302019-03-12T11:09:47+5:30

www म्हणजेच world wide web ला आज 30 वर्षं पूर्ण झाली आहेत. गुगलने यानिमित्ताने एक खास डुडल तयार केले आहे. 

google dedicates special doodle on 30 years of world wide web remembers tim berners lee | 'www'ला 30 वर्षं पूर्ण! गुगलनं बनवलं खास डुडल

'www'ला 30 वर्षं पूर्ण! गुगलनं बनवलं खास डुडल

Next
ठळक मुद्देwww म्हणजेच world wide web ला आज 30 वर्षं पूर्ण झाली आहेत.गुगलने एक खास डुडल तयार केले आहे. गुगलने हे खास डुडल तयार करताना टीम बर्नर ली यांच्या योगदानाला ही सलाम केला आहे.

नवी दिल्ली - गुगल नेहमीच रंगीबेरंगी महत्त्वपूर्ण डुडल तयार करून अनेक दिग्गजांना, त्यांच्या योगदानाला सलाम करत असतं. तर कधी महत्त्वाच्या तारखा व त्या दिवसाचे वैशिष्ट्य लक्षात घेऊन आपल्या युजर्सला खास डुडल तयार करून माहिती देत असतं. www म्हणजेच world wide web ला आज 30 वर्षं पूर्ण झाली आहेत. गुगलने यानिमित्ताने एक खास डुडल तयार केले आहे. 

कोणत्याही वेबसाइटच्या आधी world wide web (www) दिसल्यानंतरच वेगवेगळे रिसोर्सेस आणि डॉक्यूमेंट्सचे ग्रुप असतात. त्यांना एकत्र जोडून वेबसाइट तयार केली जाते. वैज्ञानिक टीम बर्नर ली यांना या शोधाचे श्रेय जाते. गुगलने हे खास डुडल तयार करताना टीम बर्नर ली यांच्या योगदानाला ही सलाम केला आहे. एखादी वेबसाइट ओपन करण्यासाठी त्याआधी www टाकावे लागते. त्याशिवाय वेबसाइट ओपन होत नाही. world wide web ला आज 30 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गुगलने खास डुडल तयार केले आहे. 

जगाला इंटरनेटची विशेष भेट देणाऱ्या टीम बर्नर ली यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. क्विंस कॉलेज आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठात त्यांनी 1976 साली फिजिक्समध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी इंटरनेट आणि वर्ल्ड वाइड वेब तयार केले. वर्ल्ड वाइड वेबला आधी सर्नने आपल्या अधिकारात ठेवले होते. मात्र 1992 साली ते सार्वजनिक करण्यात आले. 1993 साली संपूर्ण जगाला याचे अ‍ॅक्सेस देण्यात आले. www समजून घ्यायचे असेल तर या पेजवर एक टेक्स्ट, फोटोज, व्हिडिओ आणि इतर मल्टीमीडिया आपल्याला दिसेल. या सर्वांना एकत्रित जोडण्यासाठी एका हायपरलिंकची मदत होते. इंटरनेटहून माहिती मिळवण्यासाठी www काम करते. सर्व फाईल्स आणि पेजेसला आदान-प्रदान करण्याचे महत्त्वाचे काम www करत असते.

Women's Day 2019 : गुगलचं खास डुडल, नारी शक्तीला सलाम!

गुगलने याआधी 8 मार्च म्हणजेच जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एक खास डुडल तयार करून सर्वांच मन जिंकलं होतं. गुगलने खास डुडलद्वारे स्त्री शक्तीला सलाम केला होता. जगभरात महिला शक्ती आणि महिलांच्या सन्मानासाठी महिला दिन (International Womens Day) वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. गुगलनेही महिला दिनाचे औचित्य साधून एक विशेष डुडल तयार केले होते. या डुडलमध्ये 14 भाषांमधून महिला सशक्तीकरणाचे प्रेरणादायक कोट्स लिहिण्यात आले. गुगलने बनवलेल्या खास डुडलवर क्लिक केल्यानंतर जगभरातील वेगवेगवळ्या भाषांमधील कोट्स दिसत होते. तसेच कोट्स देणाऱ्या महिलांचे नाव सुद्धा देण्यात आले होते. महिलांच्या प्रेरणादायक कोट्समध्ये जगभरातील प्रतिभावंत महिलांचा एक समूह डिझाईन करण्यात आला होता. 

Web Title: google dedicates special doodle on 30 years of world wide web remembers tim berners lee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.