Google Chrome: चुकूनही अपडेट करू नका गुगल क्रोम ब्राऊजर; मायक्रोसॉफ्ट एज युजर्सनाही सावधानतेचा इशारा 

By सिद्धेश जाधव | Published: January 17, 2022 05:54 PM2022-01-17T17:54:49+5:302022-01-17T17:58:32+5:30

Google Chrome:  गेल्या काही दिवसांपासून गुगल क्रोम ब्राउजरच्या अपडेटमुळेच लोकांची सिस्टम हॅक होत आहे. एका रिपोर्टनुसार, गुगल क्रोम आणि मायक्रोसॉफ्ट एज अपडेट केल्यानंतर सिस्टम मध्ये मॅग्नीबर रँसमवेयर येत आहे.

Google chrome and microsoft edge users do not update your browser hackers targeting your deta by magniber ransomware  | Google Chrome: चुकूनही अपडेट करू नका गुगल क्रोम ब्राऊजर; मायक्रोसॉफ्ट एज युजर्सनाही सावधानतेचा इशारा 

Google Chrome: चुकूनही अपडेट करू नका गुगल क्रोम ब्राऊजर; मायक्रोसॉफ्ट एज युजर्सनाही सावधानतेचा इशारा 

Next

डिवाइसच्या सुरक्षेसाठी त्यातील ऍप्स आणि ऑपरेटिंग सिस्टम वेळोवेळी अपडेट करण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे व्हायरस किंवा मालवेयर हल्ल्याचा धोका कमी होतो. परंतु हॅकर्सनी आता हॅकिंगसाठी नवीन पद्धत शोधून काढली आहे. गेल्या काही दिवसांपासून Google Chrome वर एक स्कॅम सुरु आहे, ज्यामुळे युजर्सचे मोठे नुकसान होत आहे.  

गेल्या काही दिवसांपासून गुगल क्रोम ब्राउजरच्या अपडेटमुळेच लोकांची सिस्टम हॅक होत आहे. एका रिपोर्टनुसार, गुगल क्रोम आणि मायक्रोसॉफ्ट एज अपडेट केल्यानंतर सिस्टम मध्ये मॅग्नीबर रँसमवेयर येत आहे. या मालवेयरमुळे युजरचा डेटा धोक्यात आहे. त्यामुळे या दोन्ही ब्राउजरवर दिसणारा अपडेट ना करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 

Magniber Ransomware  

मॅग्नीबर रँसमवेयर मोबाईल किंवा सिस्टम अपडेट केल्यांनतर तुमच्या डिवाइसमध्ये येतो आणि बॅकग्राउंडमध्ये अ‍ॅक्टिव्ह होतो. त्यानंतर डिवाइसवरील सर्व फाईल एन्क्रिप्ट म्हणजे लॉक केल्या जातात आणि त्याची माहिती तुम्हाला मिळत नाही. मॅग्नीबर रँसमवेयरच काम झाल्यावर डिवाइसवरील कोणतीही फाईल ओपन करता येत नाही. या फाईल्समधील डेटा चोरून हॅकर्स ब्लॅकमेल करण्यास सुरुवात करतात.  

मॅग्नीबर रँसमवेयरपासून वाचण्याचे उपाय 

सर्वप्रथम सध्यातरी क्रोम ब्राउजर किंवा एज ब्राउजर अपडेट करू नका. तसेच तुमच्या डेटाचा बॅकअप घेऊन ठेवा. म्हणजे हल्ला झाल्यास तुम्ही संपूर्ण सिस्टम रिसेट करून तुमचा डेटा रिस्टोर करू शकता. तसेच कंप्यूटर आणि लॅपटॉपमध्ये एक पेड अँटीव्हायरसचा वापर करा आणि हा अँटीव्हायरस अपडेट करत राहा.  

हे देखील वाचा:

Amazon Sale: फक्त 11,500 रुपयांमध्ये मिळतोय Redmi चा दमदार Smart TV; या कंपन्या देखील देतायत जबरा डिस्काउंट, पाहा यादी

Flipkart Sale: 555 रुपयांमध्ये घरी आणा स्मार्टफोन; Samsung, Realme व Oppo च्या या फोन्सवर धमाकेदार ऑफर्स

Web Title: Google chrome and microsoft edge users do not update your browser hackers targeting your deta by magniber ransomware 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.