18 सप्टेंबरपासून फ्लिपकार्ट आणतय धमाकेदार ऑफर्स! फक्त 1 रुपयात करता येईल वस्तूंची प्री-बुकिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 12:11 AM2020-09-13T00:11:05+5:302020-09-13T00:13:33+5:30

या सेलदरम्यान ग्राहकांना माऊस, किबोर्ड्स, पावर बँक्स, केबल्स आणि हेडफोन्ससारख्या वस्तूंवर आकर्षक सूटही मिळेल. याशिवाय SBI कार्ड यूझर्स SBI क्रेडिट कार्ड आणि EMI ट्रांझेक्शन्सवर 10 टक्क्यांची तत्काळ सूटही मिळेल.

Flipkart big saving days from september 18 check offers | 18 सप्टेंबरपासून फ्लिपकार्ट आणतय धमाकेदार ऑफर्स! फक्त 1 रुपयात करता येईल वस्तूंची प्री-बुकिंग

18 सप्टेंबरपासून फ्लिपकार्ट आणतय धमाकेदार ऑफर्स! फक्त 1 रुपयात करता येईल वस्तूंची प्री-बुकिंग

Next

नवी दिल्ली -फ्लिपकार्टच्या (Flipkart) बिग सेव्हिंग डेज सेलला 18 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. हा सेल 20 सप्टेंबरपर्यंत सुरू राहील. यादरम्यान ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या सहाय्याने मोबाईल्स, टॅबलेट्स आणि टीव्हीसारख्या अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर सूट आणि आकर्षक ऑफर्स देण्यात येणार आहेत. याशिवाय ग्राहकांना जी वस्तू खरेदी करायची इच्छा आहे, तिची फक्त 1 रुपयात प्री-बुकिंग करण्याचे ऑप्शनदेखील फ्लिपकार्टकडून देण्यात येणार आहे.

ही प्री-बुक ऑफर केवळ 15 सप्टेंबर ते 16 सप्टेंबरपर्यंतच व्हॅलीड असेल. SBI कार्ड धारकांना, कार्ड अथवा EMIच्या माध्यमाने पेमेंट केल्यास डिस्काउंट मिळेल. मात्र बिग सेव्हिंग डेजमध्ये समाविष्ट असलेल्या प्रोडक्ट्सची यादी अद्याप फ्लिपकार्टने दिलेली नाही. मात्र, मोबाईल फोन्स आणि टॅबलेट्स घेण्याची इच्छा असणाऱ्यांना नो-कॉस्ट EMI प्लॅन्स, कार्डलेस क्रेडिट आणि एक्सचेन्ज ऑफर्सचा लाभ घेता येईल, असे या प्लॅटफॉर्मने म्हटले आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, बिग सेव्हिंग डेज सेलदरम्यान तीन कोटींहून अधिक इलेक्ट्रॉनिक्स आणि इतरही वस्तू नो-कॉस्ट EMI आणि एक्सचेन्ज ऑफर्ससह उपलब्ध असतील. या सेलदरम्यान ग्राहकांना माऊस, किबोर्ड्स, पावर बँक्स, केबल्स आणि हेडफोन्ससारख्या वस्तूंवर आकर्षक सूटही मिळेल. याशिवाय SBI कार्ड यूझर्स SBI क्रेडिट कार्ड आणि EMI ट्रांझेक्शन्सवर 10 टक्क्यांची तत्काळ सूटही मिळेल. सेलमध्ये मिळणारी प्रत्येक वस्तू ग्राहकांना प्री-बुक करता येईल, हे या सेलचे विशेष आहे.

प्री-बुकिंगसाठी ग्राहकांना फ्लिपकार्टच्या होमपेजवर प्री-बुक स्टोअरवर जावे लागेल. येथून ग्राहकांना फक्त 1 रुपयात आपली आवडती वस्तू बुक करता येईल.

महत्त्वाच्या बातम्या -

उत्तर कोरियाच्या अर्थव्यवस्थेवर उपस्थित केले प्रश्न, किम जोंग भडकला; 5 अधिकाऱ्यांना गोळी घालण्याचा दिला आदेश

CNG, PNG डिस्ट्रिब्यूटर होण्याची संधी, मोदी सरकार देणार लायसन्स

कोरोना व्हायरस : "जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नहीं"; पंतप्रधान मोदींनी दिला सावधगिरीचा इशारा

मोदी सरकार आणतंय नवी पॉलिसी, भंगारमध्ये जाणार तुमची जुनी गाडी

कमावण्याची संधी : 'या' IPOमध्ये पैसे गुंतवण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, फक्त 3 तासांतच सुपरहिट!

Web Title: Flipkart big saving days from september 18 check offers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.