'या' कंपनीकडून स्वस्तात मिळतंय Disney+Hotstar; अवघ्या 50 ​​रुपयांत होईल काम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 06:00 PM2022-05-20T18:00:48+5:302022-05-20T18:01:52+5:30

Disney + Hotstar : ऑफर अंतर्गत, तुम्हाला डेटा व्हाउचरसह Disney + Hotstar चे सब्सक्रिप्शन मोफत मिळत आहे. 

disney plus hotstar subscription plans vodafone idea vi rs 151 plan details | 'या' कंपनीकडून स्वस्तात मिळतंय Disney+Hotstar; अवघ्या 50 ​​रुपयांत होईल काम

'या' कंपनीकडून स्वस्तात मिळतंय Disney+Hotstar; अवघ्या 50 ​​रुपयांत होईल काम

googlenewsNext

नवी दिल्ली : Disney + Hotstar हे जगभरातील लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. तुम्ही या लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्मचा अॅक्सेस फक्त 151 रुपयांमध्ये मिळवू शकता. या किंमतीवर, तुम्हाला तीन महिन्यांसाठी Disney + Hotstar चे सब्सक्रिप्शन मिळेल. एवढेच नाही तर तुम्हाला यासोबत डेटाही मिळेल. 

आयपीएल सीझनमध्ये जवळपास 50 रुपये मासिक खर्चात तुम्ही या OTT प्लॅटफॉर्मचे सब्सक्रिप्शन मिळवू शकता. मात्र, हा काही सब्सक्रिप्शन प्लॅन नाही, जो तुम्ही OTT प्लॅटफॉर्मच्या वेबसाइटवरून थेट खरेदी करू शकता. दरम्यान, व्होडाफोनआयडिया (Vodafone Idea )आपल्या युजर्संना ही ऑफर देत आहे. याऑफर अंतर्गत, तुम्हाला डेटा व्हाउचरसह Disney + Hotstar चे सब्सक्रिप्शन मोफत मिळत आहे. 

व्होडाफोनआयडियाने अलीकडेच अनेक 4G डेटा व्हाउचर जाहीर केले आहेत. यापैकी एक Disney + Hotstar सब्सक्रिप्शन असलेले 151 रुपयांचे व्हाउचर देखील आहे. यामध्ये यूजर्सना 8GB डेटा मिळतो. हे डेटा व्हाउचर असल्यामुळे युजर्संना फक्त 4G डेटा मिळतो. यामध्ये व्हॉईस कॉलिंग किंवा एसएमएसचे फायदे उपलब्ध नाहीत. याची व्हॅलिडिटी 30 दिवसांची आहे. यासह, कंपनी Disney+ Hotstar चे सब्सक्रिप्शन कॉम्प्लिमेंटरी ऑफर म्हणून देत आहे. सब्सक्रिप्शनला अॅक्टिव्हेट करण्यासाठी युजर्संना कोणतेही अतिरिक्त चार्ज देण्याची गरज नाही.

डेटा देखील मिळेल
या प्लॅनची ​​किंमत 151 रुपये आहे, ज्यामध्ये तुम्हाला तीन महिन्यांसाठी Disney + Hotstar सबस्क्रिप्शन मिळेल. म्हणजेच एका महिन्यासाठी तुम्हाला जवळपास 50.33 रुपये खर्च करावे लागतील. यासोबतच तुम्हाला 8GB डेटा देखील मिळत आहे. जर तुम्हाला कमी किमतीत OTT प्लॅटफॉर्मचे सब्सक्रिप्शन घ्यायचे असेल तर तुम्ही 82 रुपयांचे डेटा व्हाउचर वापरू शकता. यामध्ये यूजर्संना Sony LIV चे सब्सक्रिप्शन मिळत आहे. 82 रुपयांच्या डेटा व्हाउचरमध्ये युजर्संना 4GB डेटा मिळेल, जो 14 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. तसेच, Sony LIV चे सबस्क्रिप्शन 28 दिवसांसाठी मिळेल.

Web Title: disney plus hotstar subscription plans vodafone idea vi rs 151 plan details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.