IPL 2021 च्या दुसऱ्या टप्प्याच्या आधी Disney+ Hotstar प्लॅन्स महागले; असे असणार नवीन प्लॅन्स

By सिद्धेश जाधव | Published: July 27, 2021 06:58 PM2021-07-27T18:58:30+5:302021-07-27T19:01:43+5:30

Disney+ Hotstar New Plans: Disney+ Hotstar ने आपले प्लॅन्स बदलले आहेत, सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मचे प्लॅन 399 रुपयांपासून सुरु होतात.  

Disney hotstar unveils new plan ott movies shows  | IPL 2021 च्या दुसऱ्या टप्प्याच्या आधी Disney+ Hotstar प्लॅन्स महागले; असे असणार नवीन प्लॅन्स

नवीन प्लॅनमधील सर्वात टॉपचा प्लॅन डिज्नी + हॉटस्टार 'प्रीमियम' नावाने ओळखला जाईल.

googlenewsNext

Disney+ Hotstar ने मंगळवारी आपले नवीन प्लॅन आणि 18 नवीन हॉटस्टार स्पेशल सीरीज आणि डिजनी+ हॉटस्टार मल्टीप्लेक्सच्या चित्रपटांची घोषणा केली आहे. हे नवीन प्लॅन्स भारतात 1 सप्टेंबरपासून लागू होतील. या ओटीटी प्लॅटफॉर्मने मोबाईल, सुपर आणि प्रीमियम अश्या तीन श्रेणीत नवीन प्लॅन सादर केले आहेत. हे नवीन प्लॅन 499 रुपयांपासून सुरु होतील. हे प्लॅन घेणाऱ्या ग्राहकांना ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सर्व कंटेंट बघता येईल. (Disney+ Hotstar New Plans price starts from 499)

Disney+ Hotstar चे नवीन प्लॅन 

1 सप्टेंबरपासून डिजनी+ हॉटस्टारचे विआयपी आणि प्रीमियम प्लॅन बंद करण्यात येतील. कंपनीच्या नवीन बेस प्लॅनचे नाव ‘मोबाईल’ असे असेल. या प्लॅनमध्ये तुम्हाला तुमचे अकॉउंट फक्त एका मोबाईल डिवाइसवर वापरता येईल आणि फक्त एचडी रिजॉल्यूशनमध्ये कंटेंट स्ट्रीम करता येईल. या प्लॅनची किंमत 499 रुपये असेल आणि हा प्लॅन वर्षभर वैध राहील.  

यापेक्षा मोठा डिजनी+ हॉटस्टारच्या प्लॅनचे नाव 'सुपर' असे आहे. या प्लॅनची किंमत 899 रुपये आहे आणि या प्लॅनची वैधता एक वर्षाची असेल. या प्लॅनला सबस्क्रिप्शन घेतल्यावर तुमचे अकॉउंट दोन डिवाइसवर वापरता येईल. या प्लॅनमध्ये एचडी रिजॉल्यूशनचा कंटेन्ट स्ट्रीम करता येईल.  

नवीन प्लॅनमधील सर्वात टॉपचा प्लॅन डिज्नी + हॉटस्टार 'प्रीमियम' नावाने ओळखला जाईल. या प्लॅनची किंमत 1,499 रुपये असेल. हा प्लॅन एक वर्ष वैधतेसह सादर करण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये 4K रिजॉल्यूशनचा कन्टेन्ट एक साथ चार डिवाइसवर स्ट्रीम करता येईल. सुपर आणि प्रीमियम प्लॅनचा वापर स्मार्टफोन, कंप्यूटर आणि टीव्हीवर करता येईल.  

 

Web Title: Disney hotstar unveils new plan ott movies shows 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.