इंडियाज मोस्ट डिझायर्ड ब्रँड्सच्या यादीत Dell अव्वल - टीआरए रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 09:38 PM2021-07-29T21:38:27+5:302021-07-29T21:46:42+5:30

Dell tops India's Most Desired Brands list : भारतातील 16 शहरांतील 2000 कन्झ्युमर-इन्फ्लुअर्सच्या मदतीने संशोधन करून ही यादी तयार करण्यात आली आहे. ही कन्झ्युमर इन्साइट्स व ब्रँड अॅनालिटिक्स कंपनी टीआरएज ब्रँड ट्रस्ट रिपोर्टही प्रकाशित करते.

Dell tops India's Most Desired Brands list - TRA Research | इंडियाज मोस्ट डिझायर्ड ब्रँड्सच्या यादीत Dell अव्वल - टीआरए रिसर्च

इंडियाज मोस्ट डिझायर्ड ब्रँड्सच्या यादीत Dell अव्वल - टीआरए रिसर्च

Next

मुंबई : टीआरएच्या 7व्या, 2021 मधील अहवालात ऑस्टिनमधील डेल ब्रँडने चार वेळा आघाडीवर असलेल्या सॅमसंग मोबाइल फोन्सना मागे टाकून इंडियाज मोस्ट डिझायर्ड ब्रँड (एमडीबी) हे स्थान पटकावले आहे. 2020 मधील अहवालाच्या तुलनेत दहा स्थाने आघाडी घेत शाओमीच्या मी ब्रँडने दुसरा मोस्ट डिझायर्ड ब्रँड हे स्थान मिळवले आहे. ग्राहकांनी टेलिव्हिजनना सर्वाधिक पसंती दिली आणि एलजी टेलिव्हिजिनला अगोदरच्या वर्षाच्या तुलनेत 12 स्थाने अधिक तिसरे 9% एमडीआय (मोस्ट डिझायर्ड इंडेक्स) स्थान दिले. त्यानंतर, चौथे स्थान सॅमसंग टेलिव्हिजनला मिळाले. अॅपल आयफोनने तीन स्थाने गमावत टीआरएज मोस्ट डिझायर्ड ब्रँड्स 2021 अहवालात भारतातील पाचवा मोस्ट डिझायर्ड ब्रँड हे स्थान मिळवले. यंदाचा हा सातवा अहवाल आहे आणि त्यामध्ये भारतातील आघाडीच्या 1000 डिझायर्ड ब्रँडचा समावेश आहे. भारतातील 16 शहरांतील 2000 कन्झ्युमर-इन्फ्लुअर्सच्या मदतीने संशोधन करून ही यादी तयार करण्यात आली आहे. ही कन्झ्युमर इन्साइट्स व ब्रँड अॅनालिटिक्स कंपनी टीआरएज ब्रँड ट्रस्ट रिपोर्टही प्रकाशित करते. डिसेंबर 2020 मध्ये या अहवालाची 11वी आवृत्ती प्रकाशित करण्यात आली.  (Dell emerges as India’s most desired brand: TRA Research)

टीआरए रिसर्चचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. चंद्रमौली यांनी अहवाल प्रकाशित केला आणि म्हणाले, “इंडियाज मोस्ट डिझायर्ड ब्रँड म्हणून मतदानामध्ये स्थान निर्माण करण्यासाठी डेलने लॅपटॉप श्रेणीमध्ये आघाडी घेतली. अहवालात नमूद केलेल्या 1000 ब्रँडमध्ये, आघाडीच्या 50 ब्रँडमध्ये 18 भारतीय, 9 अमेरिकन, 8 साउथ कोरिअन व 7 चायनिज ब्रँडचा समावेश आहे. आघाडीच्या 50 ब्रँडमध्ये 29 श्रेणी समाविष्ट असून, त्यातून ग्राहकांच्या वैविध्यपूर्ण पसंती दिसून येते, परंतु मोबाइल फोन ही सर्वात लोकप्रिय श्रेणी आहे आणि त्यामध्ये 9 ब्रँड आहेत. त्यानंतर प्रत्येकी 4 ब्रँड असलेल्या लॅपटॉप व टेलिव्हिजन श्रेणींचा समावेश आहे.”

ओप्पोने गेल्या वर्षीच्या तुलनेत 27 क्रमांक पार करत सहावे स्थान मिळवले, त्यानंतर एलजीने 2020 मधील अहवालाच्या तुलनेत 22 स्थाने आघाडी घेत सातवे स्थान मिळवले. एमडीबी 2020 च्या तुलनेत, सॅमसंग मोबाइलने सात स्थाने गमावत आठवा क्रमांक साध्य केला. टीव्ही कण्टेण्टची लोकप्रियता वाढत असली तरी सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजन, हिंदी जीईसी यांनी 5 स्थाने गमावत नववे स्थान पटकावले, तर विवोने 13 स्थाने गमावत यंदा दहावे स्थान पटकावले. 

“टीआरएचा सातवा मोस्ट डिझायर्ड अविस्मरणीय ठरणार आहे. आघाडीच्या 1000 ब्रँडमध्ये, 83% वाढलेली स्टेशनरी श्रेणी, 42% वाढलेली हेल्थकेअर श्रेणी, 40% वाढलेली उत्पादन श्रेणी आणि 21% वाढलेली गॅजेटरी श्रेणी या सुपर-कॅटेगरीजनी लक्षणीय प्रगती नोंदवली. 38% घटलेली अॅपरल श्रेणी, 33% घटलेली रिटेल श्रेणी आणि 21% घटलेली बीएफएसआय श्रेणी या सुपर-कॅटेगरीजचे वजन घटले. महामारीदरम्यान बँकांपेक्षा पेन व पेन्सिल अधिक गरजेचे का होते, याचे उत्तर फारसे अवघड नसेल”, असे चंद्रमौली यांनी नमूद केले. टीआरएज मोस्ट डिझायर्ड ब्रँड्स 2021 टीआरएच्या प्रोप्रायटरी ब्रँड डिझायर मॅट्रिक्सवर आधारित असून, हे निकष ब्रँडच्या 12 ब्रँड बिहेविअरबद्दलची मते विचारात घेतात. मोस्ट डिझायर्ड यादीमध्ये कोविडशी संबंधित ब्रँड समाविष्ट होते. त्यामध्ये सहा कोविड लसींचा समावेश होता व कोव्हॅक्सिनची आघाडी होती. तसेच, आयुर्वेदिक इम्युनिटी सप्लिमेंट्सच्या 4 ब्रँडचा समावेश होता व त्यामध्ये पतंजलीच्या इम्युनोचार्जची आघाडी होती. 


टीआरएज मोस्ट डिझायर्ड ब्रँड्समधील अन्य महत्त्वाच्या श्रेणींतील आघाडीचे ब्रँड आहेत – आठ ब्रँडना मागे टाकत खासगी बँकांमध्ये बाजी मारलेली आयसीआयसीआय बँक, वॉशिंग मशीन व रेफ्रिजटरेटर या आणखी दोन श्रेणींमध्ये आघाडीवर असलेली एलजी, दोन जर्मन स्पर्धकांना मागे टाकत फोर-व्हीलर (लक्झरी) श्रेणीमध्ये आघाडीवर असलेली बीएमडब्लू, आयपीएल टीम सीएसकेने मोस्ट डिझायर्ड ब्रँड बनत एमआयला मागे टाकले, गोदरेज इंटिरिओने 148 स्थाने पुढे जात फर्निचर रिटेलमध्ये  आघाडी घेतली, लिव्हप्युअरने 432 स्थाने पुढे जात वॉटर प्युरिफायरमध्ये आघाडी घेतली, सिएटने 142 स्थाने पुढे जात टायर्समध्ये आघाडी घेतली, पदार्पणाच्या वर्षात सेमिकंडक्टर्समध्ये आघाडी घेणारी एएमडी, 392 स्थाने वर सरकत श्रेणीमध्ये आघाडी घेणारा एसबीआय म्युच्युअल फंड, 649 स्थाने पुढे जात पाइप्स श्रेणीमध्ये आघाडी घेणारी अॅस्ट्रल, मसाल्यांच्या यादीत आघाडी घेणारी आची, इन्व्हर्टर बॅटरी श्रेणीमध्ये बाजी मारणारी ओकाया, सिरॅमिक्समध्ये पहिली आलेली सोमानी आणि आयकेअर रिटेलमध्ये बाजी मारणारी हिमालया ऑप्टिकल्स.

Web Title: Dell tops India's Most Desired Brands list - TRA Research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.