बापरे! हजारो भारतीयांचा कोरोना संबंधित सर्व डेटा लीक झाल्याचा दावा; पण मोदी सरकार म्हणतं...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 11:50 AM2022-01-22T11:50:11+5:302022-01-22T11:51:43+5:30

Covid 19 related data leaked : भारत सरकारच्या सर्व्हरमधून 20 हजारांहून अधिक लोकांची वैयक्तिक माहिती लीक झाली आहे. नाव, मोबाईल नंबर, पत्ता आणि कोविड चाचणीचा तपशील अशा प्रकारची ही माहिती आहे.

covid 19 related data of thousands of indians leaked online government report | बापरे! हजारो भारतीयांचा कोरोना संबंधित सर्व डेटा लीक झाल्याचा दावा; पण मोदी सरकार म्हणतं...

बापरे! हजारो भारतीयांचा कोरोना संबंधित सर्व डेटा लीक झाल्याचा दावा; पण मोदी सरकार म्हणतं...

Next

नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान लसीकरण आणि कोरोनाबाबतची विविध प्रकारची वैयक्तिक माहिती ही सरकारला द्यावी लागला आहे. मात्र आता हाच डेटा सरकारच्या एका सर्व्हरमधून लीक झाल्याचा मोठा दावा करण्यात आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, याबाबत केंद्र सरकारकडून तातडीने स्पष्टीकरण देण्यात आले असून या दाव्यात कोणतेही तथ्य नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. 

भारत सरकारच्या सर्व्हरमधून 20 हजारांहून अधिक लोकांची वैयक्तिक माहिती लीक झाली आहे. नाव, मोबाईल नंबर, पत्ता आणि कोविड चाचणीचा तपशील अशा प्रकारची ही माहिती आहे. ऑनलाईन सर्चच्या माध्यमातून ही माहिती सहज उपलब्ध होत आहे. लीक झालेला हा डेटा रेड फोरमच्या वेबसाईटवर विक्रीसाठीही ठेवला गेला आहे, असा दावा एका हॅकरने केल्याचे वृत्त आयएएनएस या वृत्तसंस्थेने दिले होते. हा डेटा थेट सरकारच्या सीडीएन (कंटेंट डीलिव्हरी नेटवर्क) सर्व्हरमधून आला आहे, असा दावाही या हॅकरने केला. हा डेटा गुगल सर्चमध्येही सहज उपलब्ध होत आहे. 

RT-PCR results या कीवर्डसह List of Beneficiaries Enrolled for Covid Vaccine असे सर्च केल्यास हा डेटा उपलब्ध होतो, असा दावाही करण्यात आला. इंटरनेट सुरक्षा या विषयातील तज्ज्ञ राजशेखर राजहरिया यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. व्यक्तिगत माहिती असलेला तपशील सीडीएनमधून लीक झाला असून कोविन प्लॅटफॉर्मवरील हा डेटा इंटरनेटवर सहज उपलब्ध होत आहे असं सांगत राजहरिया यांनी सतर्क केलं आहे. 

"सत्य समोर यावं म्हणून चौकशी करण्यात येईल"

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने स्पष्टीकरण देत असा कोणताही डेटा लीक झालेला नाही असं म्हटलं आहे. कोविन पोर्टलमधील डेटा लीक झाल्याचे दावे केले जात आहेत. मात्र त्यात तथ्य नसून कोविन प्लॅटफॉर्मवरील सर्व डेटा सुरक्षित आहे, असेही स्पष्ट करण्यात आले. कोविनवर आरटी-पीसीआर चाचणीचा रिपोर्टही तिथे द्यावा लागत नाही. त्यामुळे प्रथमदर्शनी हे दावे तथ्यहीन वाटत आहेत. तरीही जी माहिती पुढे आली आहे त्यामागचं सत्य समोर यावं म्हणून चौकशी करण्यात येईल, असेही केंद्राने सांगितले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


 

Web Title: covid 19 related data of thousands of indians leaked online government report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.