येत्या काळात पर्यावरणपूरक वाहनांचा असणार दबदबा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 05:00 AM2020-01-01T05:00:12+5:302020-01-01T05:00:28+5:30

जागतिक पातळीवर इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ २०१८ मध्ये १२९६७.१५६ कोटी डॉलर्सवर होती आणि २०२५ अखेर ती ३५९८५.४५६ कोटी डॉलर्सवर जाण्याचा अंदाज आहे.

In the coming days, there will be pressure on the environmentally friendly vehicles | येत्या काळात पर्यावरणपूरक वाहनांचा असणार दबदबा

येत्या काळात पर्यावरणपूरक वाहनांचा असणार दबदबा

Next

- ओंकार भिडे

जागतिक पातळीवर इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ २०१८ मध्ये १२९६७.१५६ कोटी डॉलर्सवर होती आणि २०२५ अखेर ती ३५९८५.४५६ कोटी डॉलर्सवर जाण्याचा अंदाज आहे. म्हणजेच इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठवाढीचा दर वर्षाला १५.६९ टक्के राहणार आहे, पण जागातिक पातळीवर युरोपात इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांची निर्मिती खूप चांगली असल्याने युरोपीय बाजारपेठत इलेक्ट्रिक वाहनांचा वाढीचा दर एकसारखा राहील. उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये म्हणजे प्रामुख्याने आशिया प्रशांत भागात इलेक्ट्रिक वाहनांची चलती राहणार आहे. आशिया प्रशांतनंतर युरोप व त्यानंतर उत्तर अमेरिकेची बाजारपेठ राहील, असा अंदाज
व्हॅल्युटेस संस्थेने वर्तविला आहे.

भारतात आर्थिक उदारीकरणानंतरही एक हजार लोकांमागे २२ लोकांकडे कार आहेत. अमेरिका व ब्रिटन या विकसित देशांच्या अर्थव्यवस्थेचा विचार केल्यास हे प्रमाण अनुक्रमे ९८० व ८५० आहे, तसेच चीनमध्ये कारचे प्रमाण १६२ आहे. यावरूनच भारतीय वाहन बाजारपेठेत वाढीस किती वाव आहे, हे लक्षात येते. त्यामुळे २०१८ व १९ मध्ये अनेक नवीन वाहन कंपन्या भारतात आल्या, तर पुढील वर्षभरात अजून काही कंपन्या येणार आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून भारतीय वाहन उद्योगला वाहन विक्रीत घसरणीस सामोर जावे लागले आहे. भारत ही जगातील दुसºया क्रमांकाची दुचाकींची, पाचव्या क्रमांकाची चार चाकींची व सातव्या क्रमांकाची व्यावसायिक वाहनांची बाजारपेठ आहे. वाहन विकत घेण्याचे पर्याय बदलणार आहेत. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी (आयईए)च्या मते भारतात पुढील दोन दशकांत १,००० लोकांमागे कारचे प्रमाण १७५ वर जाण्याची अपेक्षा असून, ७७५ टक्के वाढ नोंदली जाऊ शकते. त्यामुळे वेगाने वाढणाºया या बाजारपेठेसाठी केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराविषयीचा एक रोडमॅप तयार केला आहे. त्यानुसार, भारतात शहरांतर्गत वाहतुकीसाठी वापरली जाणारी सर्व सार्वजनिक वाहने ही २०३० मध्ये संपूर्णपणे इलेक्ट्रिकवरील असणार आहेत, तसेच २०३० मध्ये एकूण वाहनविक्रीच्या तुलनेत विकली जाणाºया सर्व नव्या वाहनांचे प्रमाण ४० टक्के असेल. २०४७ अखेर देशातील सर्व वाहने केवळ इलेक्ट्रिक वाहनेच करण्याचे धोरण आखले आहे. सियामने दिलेल्या आकडेवारीनुसार भारतात एप्रिल ते मार्च, २०१८-१९ मध्ये ३०,९१५,४२० वाहनांची विक्री झाली. २०१७-१८ च्या तुलनेत वाढीचा दर ६.२६ टक्के आहे.

भारतात केंद्र सरकारच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या धोरणामुळे चार्जिंग स्टेशन्स सार्वजनिक व खासगी स्वरूपात उभारली जाणार आहेत. यामध्ये गुंतवणुकीस मोठा वाव आहे, तसेच भारतात जागतिक पातळीवरील बहुतेक सर्व वाहन कंपन्यांनी प्रवेश (काही अपवाद वगळता) केला आहे. भारताची अर्थव्यवस्था ही तरुण अर्थव्यवस्था आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर येथेच व्यवसाय करण्याच्या संधी मोठ्या आहेत. त्यामुळे या बाजारपेठेकडे भविष्यातील बदलांसाठी कंपन्यांनीही सज्ज होण्यास सुरुवात केली आहे. भारतीय वाहन कंपन्यादेखील याबाबतीत मागे नाहीत. त्यांनीही इलेक्ट्रिकसाठी आवश्यक असणारे तंत्रज्ञान झपाट्याने विकसित करण्यास सुरुवात केली आहे, तसेच सध्याच्या तंत्रज्ञानात सुधारणा करण्यावर भर दिला जात आहे. टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, ह्युंदाई, निस्सान, एमजी मोटर, महिंद्र अँड महिंद्र, रेनॉ, मर्सिडिज बेंझ, आॅडी, हीरो, होंडा, टीव्हीएस, प्यूजो, बजाज आॅटो, रिव्होल्ट आदी कंपन्यांची इलेक्ट्रिक वाहने बाजारात येणार आहेत.

79% प्रमाण देशातील एकूण वाहनांमध्ये दुचाकींचे
12% प्रमाण दहा लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या कारचे
4% प्रमाण तीनचाकींचे
3% प्रमाण बस व मोठे मोठी व्यावसायिक वाहने
2% प्रमाण दहा लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या कारचे

Web Title: In the coming days, there will be pressure on the environmentally friendly vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.