मोबाइल वापराचे नियम ठरवता येतात का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 05:51 AM2021-04-29T05:51:53+5:302021-04-29T05:55:02+5:30

मोबाइलच्या व्यसनातून झालेल्या मेंदूतील रासायनिक असमतोलामुळं आईवर हल्ला करणाऱ्या त्या दहावीच्या मुलाविषयी आपण बोलत होतो. त्याचं म्हणणं दोन सेशन्स ...

Can mobile usage rules be determined? | मोबाइल वापराचे नियम ठरवता येतात का?

मोबाइल वापराचे नियम ठरवता येतात का?

googlenewsNext

मोबाइलच्या व्यसनातून झालेल्या मेंदूतील रासायनिक असमतोलामुळं आईवर हल्ला करणाऱ्या त्या दहावीच्या मुलाविषयी आपण बोलत होतो. त्याचं म्हणणं दोन सेशन्स ऐकून घेतल्यावर पुढच्या सेशनला तो येईपर्यंत आम्ही व्यक्तिमत्त्वाचे पॅटर्न कसे असतात त्यावर जरा अधिकचं वाचून घेतलं. त्या वेळी अमेरिकेच्या किंबर्ली यंग यांनी रिसर्चसाठी केलेला एक अभ्यास आम्हाला सापडला.

१९९०  मध्ये हे संशोधन त्यांनी केलं ते मैत्रिणीच्या नवऱ्याच्या इंटरनेट अ‍ॅडिक्शनमुळं. हा माणूस त्या काळात महिन्याकाठी  शेकडो डॉलर्स खर्च करायचा. का? - तर ‘अमेरिका ऑनलाइन’ या तत्कालीन प्रसिद्ध पोर्टलच्या चॅट रूममध्ये राहता यावं म्हणून! त्याच्या अ‍ॅडिक्शनचा अभ्यास करताना किंबर्ली यांना जाणवलं की दारू किंवा ड्रग्जच्या व्यसनाइतकंच हे चढणारं व्यसन आहे. त्याचा मेंदूवर जबरदस्त परिणाम होतो.

कोकेन नि हेरॉईनसारखी मादकद्रव्यं जसा मेंदूचा ताबा घेतात तसाच डिजिटल डिव्हाईसेसनी परिणाम घडतो. त्यातून किंबर्ली यांनी काही गाइडलाइन्स मांडल्या. वयाच्या तीन वर्षांपर्यंत कुठलंही डिजिटल साधन मुलांकडं मुळीच देऊ नये. वय वर्ष तीन ते सहा यांना पालकांच्या उपस्थितीत तासभर दिलं तरी चालेल. वय वर्ष सहा ते नऊ यांनी दिवसातून दोन तासांपेक्षा जास्त काळ डिजिटल साधन हाताळू नये. नऊ ते बारा वयातल्या मुलामुलींनी दिवसातून दोन तास डिजिटल साधनं हाताळावीत व काही प्रमाणात त्यावर सोशल मीडिया वापरण्याचं स्वातंत्र्य त्यांना दिलं जावं. वय वर्ष बारा ते अठरा यांनी डिजिटल साधनं हाताळावीत, पण ‘डिजिटल डाएट’ किती असावा याचं स्वत:चं भान राखावं. 

किंबर्लीं यांच्या सूचना खूप महत्त्वाच्या होत्या, पण आम्हाला आजचा काळ व गरज विचारात घेऊन काही आचारसंहिता आखावी लागणार होती. ऐकून घेतल्यामुळं त्या मुलाचा विश्‍वास आम्ही जिंकला होता. त्याच्यासोबत आईवडिलांना घेऊन आम्ही काही नियम ठरवले. किंबर्ली यांच्या प्रश्‍नावलीच्या धर्तीवर आपला मोबाइल वापर किती व कशासाठी याची उत्तरं घेतली. त्यानुसार वेळेचं बजेट तयार केलं. “खेळ, वाचन, घरच्या गप्पागोष्टी, स्वत:ची जबाबदारीची कामं अशा दहा गोष्टी तू करशील तेव्हा चार तास मोबाइल व इंटरनेट वापर. आईबाबाही तसंच करतील..” - असा बेत ठरला. त्याला तो पटलाही! 

Web Title: Can mobile usage rules be determined?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.