खूशखबर! Flipkart ने आणखी भन्नाट ऑफर; मोफत स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी; जाणून घ्या कसं?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2021 11:29 AM2021-01-14T11:29:29+5:302021-01-14T12:02:50+5:30

Flipkart Offer Free Smartphone : फ्लिपकार्टने भन्नाट ऑफर आणली असून ती 17 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या ऑफरअंतर्गत फ्लिपकार्टवरुन फ्रीमध्ये स्मार्टफोन खरेदी करता येऊ शकतो.

buy smartphone free with flipkart smart pack subscription service | खूशखबर! Flipkart ने आणखी भन्नाट ऑफर; मोफत स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी; जाणून घ्या कसं?

खूशखबर! Flipkart ने आणखी भन्नाट ऑफर; मोफत स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी; जाणून घ्या कसं?

Next

नवी दिल्ली - ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ई-कॉमर्स कंपन्यांची जय्यत तयारी सुरू आहे. फ्लिपकार्टवरून ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. कारण फ्लिपकार्ट आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर सुरू करणार आहे. स्मार्टफोन खरेदीचा विचार करत असाल तर ही ऑफर बेस्ट आहे. यामध्ये ग्राहकांना विविध कंपनीच्या स्मार्टफोन आणि विविध वस्तुंच्या खरेदीवर भरघोस सूट देण्यात आली आहे. ग्राहकांना ऑफरमध्ये स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि इतर गोष्टी ऑफर प्राईजमध्ये खरेदी करता येते. मात्र आता कंपनी एका ऑफरमध्ये आपल्या ग्राहकांना मोफत स्मार्टफोन खरेदी करण्याची खास संधी देत आहे. 

फ्लिपकार्टने हा भन्नाट ऑफर आणली असून ती 17 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या ऑफरअंतर्गत फ्लिपकार्टवरुन फ्रीमध्ये स्मार्टफोन खरेदी करता येऊ शकतो. यामध्ये ग्राहक आपल्या आवडीचा स्मार्टफोन खरेदी करू शकतात. फ्लिपकार्ट स्मार्टपॅक प्रोग्राम एक सब्सक्रिप्शन बेस्ड सर्व्हिस आहे. यासाठी ग्राहकांना स्मार्टफोन खरेदी करताना 12 महिने किंवा 18 महिन्यांचं सब्सक्रिप्शन खरेदी करावं लागेल. सब्सक्रिप्शनचा कालावधी संपल्यानंतर ग्राहकाला त्या स्मार्टफोनचा 100 टक्के कॅशबॅक मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. 

जाणून घ्या काय आहे फ्लिपकार्टची खास ऑफर

फ्लिपकार्ट युजर्सला गोल्ड, सिल्व्हर, ब्रॉन्झ स्मार्टपॅक ऑफर करेल. याचा कालावधी 12 महिने ते 18 महिनांपर्यंत असेल. या स्मार्टपॅकचं मासिक शुल्क 399 रुपयांपासून सुरू आहे. ग्राहक नवीन स्मार्टफोन खरेदी करताना यापैकी एका स्मार्टपॅकची आपल्या आवडीनुसार निवड करू शकतात. स्मार्टपॅकची खरेदी केल्यानंतर ग्राहकांना SonyLIV, Zee5 Preimum, Voot Select, Zomato Pro अशा सर्व्हिसेस मिळणार आहेत.

"या" आहेत अटी

स्मार्टपॅकचा सब्सक्रिप्शन टाईम संपल्यानंतर ग्राहकांना स्मार्टफोनचे 100 टक्के पैसे परत मिळतील. मात्र त्यासाठी आपला फोन चालू स्थितीत ठेवावा लागेल. फोन चालू स्थितीत असण्यासह फोनवर आयएमईआय नंबर दिसायला हवा. गोल्ड प्लॅनमध्ये ग्राहकांना 100 टक्के कॅशबॅक मिळेल. सिल्व्हर पॅकमध्ये 80 टक्के मनीबॅक मिळेल. तर ब्रॉन्झ पॅकमध्ये ग्राहकांना आपल्या स्मार्टफोनच्या खरेदीवर 60 टक्के पैसे परत मिळणार आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: buy smartphone free with flipkart smart pack subscription service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.