Budget Phones Under 7000: स्वस्त स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करताय? मग 7 हजार रुपयांच्या आत येणाऱ्या फोन्सची ही यादी पाहाच 

By सिद्धेश जाधव | Published: December 4, 2021 07:10 PM2021-12-04T19:10:07+5:302021-12-04T19:10:26+5:30

Budget Phones Under 7000: या यादीत Redmi, Samsung, Realme सारख्या लोकप्रिय कंपन्यांसह Infinix आणि itel च्या स्मार्टफोन्सचा समावेश करण्यात आला आहे, ज्यांची किंमत 7,000 रुपयांच्या आत आहे.  

Budget phone under 7000 rupees avalaible in India list   | Budget Phones Under 7000: स्वस्त स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करताय? मग 7 हजार रुपयांच्या आत येणाऱ्या फोन्सची ही यादी पाहाच 

Budget Phones Under 7000: स्वस्त स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करताय? मग 7 हजार रुपयांच्या आत येणाऱ्या फोन्सची ही यादी पाहाच 

googlenewsNext

भारतीय ग्राहक स्मार्टफोनची खरेदी करताना किंमतीचा विचार जास्त करतात. तसेच बजेट कितीही कमी असले तरी स्पेसीफिकेशन आणि फीचर्स मात्र वरच्या दर्जाचे हवे असतात. तुम्ही देखील अगदी टाईट बजेट घेऊन स्मार्टफोन शोधत असाल तर, पुढे आम्ही अशा स्मार्टफोन्सची यादी दिली आहे जे 7,000 रुपयांच्या चांगले स्पेक्स देतात.  

Itel A23 Pro  

Itel A23 Pro स्मार्टफोन फ्लिपकार्टवर 4,189 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. हा बेसिक स्मार्टफोन आहे, जो 1 जीबी रॅम आणि 8 जीबी स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. फोनमध्ये 5 इंचाचा डिस्प्ले आणि 2 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा मिळतो. पॉवर बॅकअपसाठी कंपनीनं 2400 एमएएचची बॅटरी दिली आहे. 

Redmi Go  

किंमतीच्या बाबतीत शाओमी भारतीयांना निराश करत नाही. Redmi Go स्मार्टफोन 4,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. फोनमध्ये 5 इंचाचा डिस्प्ले, 1 जीबी रॅम आणि 8 जीबी स्टोरेज मिळते, ही स्टोरेज 128 जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा सिंगल रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनला स्नॅपड्रॅगन 425 प्रोसेसरची ताकद देण्यात आली आहे. तसेच यात 3000 एमएएच बॅटरी मिळते.  

IKALL K260 4G  

IKALL K260 4G फोन कंपनीनं 5.45 इंचाचा डिस्प्ले, 2 जीबी रॅम आणि 16 जीबी स्टोरेजसह सादर केला आहे. फोटोग्राफीसाठी यात 8 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. 3600 एमएएच बॅटरी असलेल्या या फोनची किंमत 4,499 रुपये ठेवण्यात आली आहे.  

Itel A25  

आयटेलचा दुसरा फोन या यादीत आला आहे. Itel A25 फोनमध्ये 5 इंचाचा डिस्प्ले, 1 जीबी रॅम आणि 16 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. हा 5 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. 4,559 रुपयांचा हा फोन 3020 एमएएचच्या बॅटरीसह बाजारात आला आहे. 

Samsung Galaxy M01 core 

स्मार्टफोनच्या बाबतीत भारतीयांना सॅमसंगचे फक्त नावच पुरे आहे. Samsung Galaxy M01 core फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. ज्यात 5.3 इंचाचा डिस्प्ले, 1 जीबी रॅम, 16 जीबी स्टोरेज मिळते. ही स्टोरेज 512 जीबी पर्यंत वाढवता येते. फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. 3000 एमएएच बॅटरी असलेला हा फोन 4,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. 

Infinix Smart 5A 

Infinix Smart 5A फोनमध्ये 6.52-इंचाचा HD+ डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. यात क्वॉड कोर MediaTek Helio A20 SoC ची ताकद देण्यात आली आहे. तसेच यातील 8MP मुख्य सेन्सर असलेला ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि 8MP चा सेल्फी शुटर देण्यात आला आहे. Infinix Smart 5A फ्लिपकार्टवर 6,699 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.   

Xiaomi Redmi 9A 

Redmi 9A फोनमध्ये 6.53-इंचाचा HD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच यात साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. या फोनमध्ये ऑक्ट-कोर MediaTek Helio G25 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच यात 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी 13MP चा रियर कॅमेरा आणि 5MP सेल्फी शुटर मिळतो. Redmi 9A ची किंमत 6,999 रुपये आहे.  

Realme C11 

Realme C11 स्मार्टफोन 6.5-इंचाचा HD+ डिस्प्ले आणि MediaTek Helio G35 प्रोसेसरसह बाजारात आला आहे. या मोबाईलमध्ये 13MP चा रियर कॅमेरा आणि 5MP सेल्फी कॅमेरा कंपनीनं दिला आहे. तसेच Android 10 सह येणारा हा फोन 5000mAh बॅटरीला सपोर्ट करतो. Realme C11 स्मार्टफोन 6,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. 

Lava Z2 

Lava Z2 स्मार्टफोन Android 11 (Go Edition) सह सादर करण्यात आला आहे. यात 6.5-इंचाचा HD+ IPS डिस्प्ले देण्यात आला आहे. यात ऑक्टकोर MediaTek Helio प्रोसेसर मिळतो. विविध फोटोग्राफी मोडसह कंपनीनं यात 8MP चा रियर कॅमेरा सेन्सर दिला आहे. हा डिवाइस 5MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पॉवर बॅकअपसाठी यात 5000mAh ची बॅटरी मिळते. या फोनचा 2GB व्हेरिएंट 7,399 रुपयांमध्ये कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. 

Web Title: Budget phone under 7000 rupees avalaible in India list  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.