8,300mAh बॅटरीसह शानदार Rugged Smartphone लाँच; उंचावरून पडल्यावर देखील फुटणार नाही इतका मजबूत 

By सिद्धेश जाधव | Published: October 18, 2021 11:48 AM2021-10-18T11:48:32+5:302021-10-18T11:48:39+5:30

Waterproof Phone OUKITEL WP17 With Fast Charging: OUKITEL WP17 स्मार्टफोन Waterproof Phone म्हणून जागतिक बाजारात सादर करण्यात आला आहे. हा फोन Fast Charging ला सपोर्ट करतो. तसेच यात 8,300mAh ची BIg Battery आहे.

Big Battery Strong Rugged Phone OUKITEL WP17 with MIL-STD-810G certification and 8300mAh Battery  | 8,300mAh बॅटरीसह शानदार Rugged Smartphone लाँच; उंचावरून पडल्यावर देखील फुटणार नाही इतका मजबूत 

8,300mAh बॅटरीसह शानदार Rugged Smartphone लाँच; उंचावरून पडल्यावर देखील फुटणार नाही इतका मजबूत 

googlenewsNext

प्रत्येकाची स्मार्टफोनची गरज वेगवेगळी असते. काहींना गेमिंगसाठी चांगला प्रोसेसर हवा असतो, तर काहींना फोटग्राफीसाठी कॅमेरा. परंतु काहींना मजबूत बॉडी असलेला स्मार्टफोन हवा असतो, असे लोक Rugged Phone उत्तम पर्याय ठरू शकतात. आज आपण अशाच एका Strong Phone ची माहिती घेणार आहोत. OUKITEL WP17 नावाचा हा फोन 8,300mAh Battery (Big Battery) सह लाँच करण्यात आला आहे. 

OUKITEL WP17 चे स्पेसिफिकेशन्स 

या फोनमध्ये 6.78-इंचाचा फुल एचडी+ आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 20:9 अस्पेक्ट रेशियो आणि 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. OUKITEL WP17 मध्ये कंपनीने 2.05गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो जी95 चिपसेट दिला आहे. त्याला माली जी 76 जीपीयूची जोड देण्यात आली आहे. हा फोन 8GB RAM आणि 128GB Storage ला सपोर्ट करतो.  

strong phone with big battery and waterproof feature named OUKITEL WP17
strong phone with big battery and waterproof feature named OUKITEL WP17

OUKITEL WP17 जागतिक बाजारात MIL-STD-810G certification सह सादर करण्यात आला आहे. हा एक शॉकप्रूफ फँन आहे, त्यामुळे उंचावरून पडल्यावर देखील या फोनला काही होत नाही. तसेच हा स्मार्टफोन IP68/IP69K वॉटर आणि डस्ट रेजिस्टन्ससह सादर करण्यात आला आहे. या फोनची अजून खासियत म्हणजे 8,300mAh battery देण्यात आली आहे ही बॅटरी 18W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सपोर्ट देण्यात आला आहे. 

फोटोग्राफीसाठी या डिवाइसमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 20 मेगापिक्सलची नाइट विजन लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. यातील सेल्फी कॅमेरा 16 मेगापिक्सलचा आहे. या फोनची किंमत 399.99 डॉलर (सुमारे ₹ 30,000) आहे.  

Web Title: Big Battery Strong Rugged Phone OUKITEL WP17 with MIL-STD-810G certification and 8300mAh Battery 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.