Alert! धोक्याची घंटा! एका मिनिटात बँक अकाऊंट खाली होतेय; मोबाईलमध्ये नवा व्हायरस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 03:48 PM2021-09-23T15:48:39+5:302021-09-23T15:49:57+5:30

Drinik trojan malware attack on Indians>: मालवेअर तुमचा कॉल, एसएमएस आदीचा ताबा घेतो आणि तुमचे खाते खाली करतो. इनकम टॅक्स रिफंडचे जाळे पसरवून तो मोबाईलमध्ये घुसू लागला आहे.

Beware of Drinik trojan malware attack, MeitY warns customers of 27 major banks | Alert! धोक्याची घंटा! एका मिनिटात बँक अकाऊंट खाली होतेय; मोबाईलमध्ये नवा व्हायरस

Alert! धोक्याची घंटा! एका मिनिटात बँक अकाऊंट खाली होतेय; मोबाईलमध्ये नवा व्हायरस

googlenewsNext

अँड्रॉईड युजरवर पुन्हा एकदा मोठा धोका उत्पन्न झाला आहे. CERT-IN नुसार Drinik मालवेयर भारतीय युजरना टार्गेट करू लागला आहे. इनकम टॅक्स रिफंडचे जाळे पसरवून तो मोबाईलमध्ये घुसू लागला आहे. हा एक बँकिंग ट्रोजन असून मोबाईल स्क्रीन फिशिंग करून युझर्सची माहिती हॅकरपर्यंत पोहोचवत आहे. (Government warns Android phone users of banking scam app.)

मोबईल युजरला फिशिंग वेबसाइट (आयकर विभाग, भारत सरकार) सारख्या लिंक एसएमएसद्वारे पाठविल्या जातात. तिथे त्यांना त्यांची माहिती भरायची असते. एका एपीके फाईलला डाऊनलोड करून इन्स्टॉल करण्यास सांगितले जाते. हे तुमचे व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण करण्यासाठी केले जाते. मालवेअरचे हे अॅप आयकर विभागाच्या अॅपसारखेच दिसते. 

मालवेअर इन्स्टॉल होत असताना युजरला परमिशन विचारल्या जातात. त्यानंतर एक फॉर्म ओपन होतो आणि तिथे माहिती भरण्यास सांगितले जाते. Drinik युजरचे नाव, पॅन, आधार नंबर, पत्ता, जन्म तारीख, मोबाईल नंबर, ईमेल आदी माहिती चोरतो. तसेच अकाऊंट नंबर, आयएफएससी कोड, डेबिट-क्रेडिट कार्ड नंबर आदी माहिती चोरली जाते. 

आयकर विभागाला ठराविक रक्कम भरायची आहे असे सांगून तुम्हाला तिथे रक्कम भरण्यास सांगितली जाते. ही रक्कम ट्रान्सफर करतेवेळी तिथे एरर येतो. हा एरर आला की हॅकरचे काम सुरु होते. मालवेअर तुमचा कॉल, एसएमएस आदीचा ताबा घेतो आणि तुमचे खाते खाली करतो. यामुळे अशा लिंक पासून सावध रहावे. असा मेसेज आला तर तो लगेचच डिलीट करावा. त्या लिंकवर क्लिक करू नये.

Read in English

Web Title: Beware of Drinik trojan malware attack, MeitY warns customers of 27 major banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.