तंत्रज्ञानाची किमया! चित्रपट पाहत असताना...; Apple वॉचमुळे वाचला २६ वर्षीय तरुणाचा जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 15:14 IST2025-11-02T15:13:03+5:302025-11-02T15:14:32+5:30
Apple वॉचने पुन्हा एकदा एका व्यक्तीचा जीव वाचवला आहे. मध्य प्रदेशातील एका व्यक्तीने Apple वॉचच्या या फीचरचे आभार मानले आहेत.

तंत्रज्ञानाची किमया! चित्रपट पाहत असताना...; Apple वॉचमुळे वाचला २६ वर्षीय तरुणाचा जीव
एकेकाळी फक्त वेळ पाहण्यासाठी घड्याळ वापरलं जात होतं, पण आता स्मार्टवॉच लोकांचा जीव वाचवत आहे. Apple वॉचने पुन्हा एकदा एका व्यक्तीचा जीव वाचवला आहे. मध्य प्रदेशातील एका व्यक्तीने Apple वॉचच्या या फीचरचे आभार मानले आहेत.
मध्य प्रदेशातील राईस मॅन्यूफॅक्चरर साहिल (२६) याने Apple वॉचच्या खास फिचरला त्याचा जीव वाचवल्याबद्दल थँक्स म्हटलं आहे. वॉचने साहिलला वेळेवर अलर्ट दिला आणि रुग्णालयात दाखल झाल्यामुळे त्याचा जीव वाचला.
साहिल जवळजवळ तीन वर्षांपासून Apple वॉच सिरीज ९ वापरत आहे. गेल्या आठवड्यात, तो व्यवसायासाठी जबलपूरला गेला होता आणि ट्रेनने परतणार होता तेव्हा अचानक त्याच्या स्मार्टवॉचने त्याच्या हॉर्ट रेटबद्दल अलर्ट दाखवायला सुरुवात केली.
एका बिझनेस मीटिंगनंतर साहिल चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. यानंतर, सुमारे तीन तास चित्रपट पाहत असताना, त्याचं स्मार्टवॉच त्याला त्याच्या हार्ट रेटबद्दल अलर्ट देऊ लागलं. त्याचा हार्ट रेट १५० होता.
चित्रपट पाहिल्यानंतर साहिलच्या ट्रेनची वेळ झाली. त्यामुळे त्याने अचानक वाढलेल्या हार्ट रेटकडे दुर्लक्ष केलं नाही. जेव्हा तो डॉक्टरकडे तपासणीसाठी गेला तेव्हा त्याने ईसीजी केला, जो सामान्य दिसत होता. त्यानंतर त्याची ब्ल़ड टेस्ट करण्यात आली आणि रिपोर्ट पाहिल्यानंतर डॉक्टरांनी त्याला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला.
साहिलचं ब्लड प्रेशर १८०/१२० होतं. डॉक्टरांनी त्याला सांगितलं की त्याचा हार्ट रेट खूप जास्त आहे आणि ट्रेन प्रवासादरम्यान त्याला स्ट्रोक किंवा ब्रेन हॅमरेज झालं असतं. मात्र त्याच्या स्मार्टवॉचमुळे त्याची जीव वाचला आहे. यानंतर, त्याने थेट Apple चे सीईओ टिम कुक यांना ईमेल केला. Apple वॉचमध्ये हेल्थ ट्रॅकिंगसह अनेक उपयुक्त फीचर्स मिळतात.