Apple launches stunning Iphone 12 series; Know the price and features | Apple ची जबरदस्त Iphone 12 सिरीज लाँच; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Apple ची जबरदस्त Iphone 12 सिरीज लाँच; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

ठळक मुद्देअ‍ॅपल कंपनीने पहिल्यांदाच 5 जी स्मार्टफोन लाँच केले आहेत.अन्य कंपन्यांचे ५ जी स्मार्टफोन येऊन सहा ते 8 महिने झाले आहेत. आयफोन 12 मध्ये ड्युअल कॅमेरा देण्यात आला असून अल्ट्रा वाईड, नाईट मोड देण्यात आला आहे.

नवी दिल्ली : अमेरिकेची मोठी कंपनी अ‍ॅपलने आयफोन 12 सिरीज लाँच केली आहे. यामध्ये ४ स्मार्टफोन लाँच केले असून सर्वात महागडे आयफोन 12 प्रो (iPhone 12 Pro) 999 डॉलर (73309.12 रुपये) आणि आयफोन 12 प्रो मॅक्स (iPhone 12 Pro Max) 1099 डॉलर (80647.37 रुपये) किंमतील बाजारात उतरविला आहे. 


महत्वाचे म्हणजे कंपनीने आयफोन 12 मिनी (iPhone 12 mini) देखील लाँच केला आहे. हा फोन दोन स्क्रीन साईजमध्ये असून 5.4 आणि 6.1 इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. यामध्ये सारे फिचर हे आयफोन 12 चेच आहेत. कंपनीचा दावा आहे की हा जगातील सर्वात स्लीम, छोटा आणि फास्ट 5 जी स्मार्टफोन आहे.  iPhone 12 mini च्या 5.4 इंच साईजचा व्हेरिअंट 699 डॉलरला (51294.37 रुपये) बाजारात उतरविला आहे. तर .  iPhone 12 mini चा 6.1 इंचाचा व्हेरिअंट 799 डॉलर (58632.62 रुपये) ला लांच करण्यात आला आहे. 


भारतात 30 ऑक्टोबरपासून विक्री
iPhone 12 आणि iPhone 12 mini 64GB, 128GB व 256GB व्हेरिअंटमध्ये 4 रंग उपलब्ध आहेत. तर iPhone 12 Pro आणि  iPhone 12 Pro Max 128GB, 256GB आणि 512GB व्हेरिअंट आणि graphite, silver, gold आणि pacific blue रंगामध्ये उपलब्ध आहेत. अ‍ॅपलच्या आयफोन 12 सिरीजचे फोन 30 ऑक्टोबरपासून भारतात उपलब्ध होणार आहेत. 


आयफोन 12 चे स्पेसिफिकेशन
अ‍ॅपल कंपनीने पहिल्यांदाच 5 जी स्मार्टफोन लाँच केले आहेत. अन्य कंपन्यांचे ५ जी स्मार्टफोन येऊन सहा ते 8 महिने झाले आहेत. 5G मुळे आयफोनचा वेगही वाढला आहे. आयफोन 12 ला blue, red, black, white आमि green रंगात लाँच करण्यात आले आहे. या नव्या स्मार्टफोनमध्ये A14 Bionic processor प्रोसेसर आहे. तर आयफोन 12 प्रो आणि आयफोन 12 प्रो मॅक्समध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा आहेत. यामध्ये मोठे सेन्सर आणि पिक्चर क्वालिटी उत्तम देण्यात आली आहे.


आयफोन 12 मध्ये ड्युअल कॅमेरा देण्यात आला असून अल्ट्रा वाईड, नाईट मोड देण्यात आला आहे. वायरलेस फास्ट चार्जिंगसाठी मॅगसेफ (MagSafe) प्रणाली देण्यात आली आहे. 


होमपॅड मिनी 
अ‍ॅपलचे होमपॅड मिनी 99 डॉलर म्हणजेच 7,268 रुपयांना मिळणार आहे. हा अ‍ॅपलचा स्मार्ट स्पीकर आहे. यामध्ये आर्टिफिशीअल इन्टेलिजन्स वापरण्यात आली आहे. याद्वारे गेट लॉक करणे, लाईट बंद करणे आदी कामे करता येऊ  शकतात. 

Web Title: Apple launches stunning Iphone 12 series; Know the price and features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.