Apple ची सुरक्षा क्षणात ढेपाळली; चिनी हॅकरने 15 सेकंदात केला iPhone 13 Pro हॅक  

By सिद्धेश जाधव | Published: October 25, 2021 12:27 PM2021-10-25T12:27:23+5:302021-10-25T12:27:32+5:30

iPhone 13 Pro Hacked In 15 Seconds: चीनमध्ये आयोजित Tianfu Cup या एका हॅकिंग स्पर्धेत iOS 15.0.2 असलेला लेटेस्ट Apple iPhone 13 Pro फक्त 15 सेकंदात हॅक करण्याचा विक्रम हॅकर्सनी केला आहे.

Apple iPhone 13 Pro Hacked in 15 seconds by Chinese mobile hacking competition  | Apple ची सुरक्षा क्षणात ढेपाळली; चिनी हॅकरने 15 सेकंदात केला iPhone 13 Pro हॅक  

Apple ची सुरक्षा क्षणात ढेपाळली; चिनी हॅकरने 15 सेकंदात केला iPhone 13 Pro हॅक  

googlenewsNext

Apple iPhones च्या जाहिरातींमध्ये प्रायव्हसी आणि सिक्योरिटीवर जास्त भर दिला जातो. आपले फोन्स Android Phones च्या तुलनेत किती सुरक्षित आहेत हे कंपनी सतत सांगत असते. परंतु कंपनीचा हा दावा काही क्षणातच फोल ठरला आहे. एका चिनी हॅकरने फक्त 15 सेकंदात iPhone 13 Pro फोन Hack करून नवीन रेकॉर्ड तर नावे केलाच सोबत बक्षीस देखील मिळवलं आहे.  

चीनमध्ये Tianfu Cup या हॅकिंग स्पर्धेचे आयोजन दरवर्षी केले जाते. ज्यात जगभरातील हॅकर्स सहभागी होतात आणि वेगवेगळ्या हॅकिंगच्या स्पर्धांमध्ये भाग घेतात. अशीच एक स्पर्धा iPhone 13 Pro हॅक करण्याची ठेवण्यात आली होती. ज्यात हॅकर्सनी खूप कमी वेळात एकदा नव्हे तर दोनदा आयफोन 13 प्रो हॅक करून Apple ला ठेंगा दाखवला आहे. ही स्पर्धा संपन्न झाल्यानंतर विजयी संघ फोन हॅक कसा केला हे सांगतात. त्यामुळे स्मार्टफोन निर्माण करणाऱ्या कंपन्या फोनमधील तो दोष दूर करण्याचे काम करतात. 

Kunlun Lab team ने हा पराक्रम केला आहे. त्यांनी तियानफू कपमध्ये फक्त 15 सेकंदात लेटेस्ट iOS 15.0.2 वर चालणार अ‍ॅप्पल आयफोन 13 प्रो हॅक केला आहे. यासाठी चमूने Apple Safari browser चा वापर केला आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण देखील करण्यात आले होते. फक्त कुनलुन लॅब नव्हे तर Pangu team ने देखील हा फोन हॅक करून नवीन रेकॉर्ड बनवला आहे. या कारनाम्यासाठी त्यांना 3,00,000 डॉलर म्हणजे जवळपास सव्वा दोन कोटी रुपये बक्षीस स्वरूपात मिळाले आहेत.  

Web Title: Apple iPhone 13 Pro Hacked in 15 seconds by Chinese mobile hacking competition 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.