Airtel ग्राहकांना देणार मोठा झटका! याबाबत स्वत: सीईओंनी सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 07:10 PM2022-05-21T19:10:24+5:302022-05-21T19:15:14+5:30

Airtel : खासगी दूरसंचार कंपनी एअरटेल  (Airtel) यावर्षी आपल्या प्रीपेड प्लॅनच्या (Prepaid Plans) किंमती वाढवणार आहे.

airtel shocks users airtel to increase price of prepaid plans airtel prepaid plans price hike 2022 says ceo Gopal Vittal | Airtel ग्राहकांना देणार मोठा झटका! याबाबत स्वत: सीईओंनी सांगितलं

Airtel ग्राहकांना देणार मोठा झटका! याबाबत स्वत: सीईओंनी सांगितलं

Next

नवी दिल्ली : सध्याच्या महागाईच्या काळाता आता तुम्हाला आणखी एक धक्का बसू शकतो. टेलिकॉम कंपन्यांचे प्लॅन ठरवून कोणी खरेदी करत नाही, कारण ते टाळता येत नाही, ही आजची गरज आहे. देशात अनेक टेलिकॉम कंपन्या कार्यरत आहेत, ज्या एकापेक्षा जास्त पॅक ऑफर करतात. दरम्यान, खाजगी टेलिकॉम कंपनी एअरटेल (Airtel) आगामी काळात आपल्या प्रीपेड प्लॅनच्या (Prepaid Plans) किंमती वाढवणार आहे आणि कंपनीचे सीईओ (CEO) गोपाल विठ्ठल (Gopal Vittal) यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे. 

खासगी दूरसंचार कंपनी एअरटेल  (Airtel) यावर्षी आपल्या प्रीपेड प्लॅनच्या (Prepaid Plans) किंमती वाढवणार आहे. या वृत्ताला कंपनीचे सीईओ (CEO) गोपाल विठ्ठल (Gopal Vittal) यांनी दुजोरा दिला आहे. प्रीपेड प्लॅनच्या किंमती कधी वाढवल्या जातील याची कोणतीही तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही, मात्र असे केले जाणार आहे.

प्रीपेड प्लॅन्सच्या वाढीबाबत एअरटेलचे (Airtel) सीईओ गोपाल विठ्ठल (Gopal Vittal) म्हणाले की, प्रीपेड प्लॅनच्या किमती यावर्षी (2022) वाढवल्या जातील. त्यांचे म्हणणे आहे की, किंमत निश्चितपणे वाढवली जाईल, जेणेकरून कंपनीचा प्रति युजर सरासरी महसूल (Average Revenue per User) 200 रुपये ठेवता येईल. तसेच, किंमत वाढवूनही प्रीपेड प्लॅनची ​​किंमत खूपच कमी होईल, असे गोपाल विठ्ठल यांचे म्हणणे आहे. 

दरम्यान, एअरटेल (Airtel) ही देशातील पहिली टेलिकॉम कंपनी होती, जिने नोव्हेंबर 2021 मध्ये अचानक प्लॅनच्या किंमती वाढवल्या. एअरटेलनंतरच रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि व्होडाफोन आयडियाने (Vodafone Idea) आपल्या प्लॅनची ​​किंमत वाढवली. आता पुन्हा एकदा एअरटेल आपल्या प्रीपेड प्लॅनच्या किंमती वाढवणार आहे.

Web Title: airtel shocks users airtel to increase price of prepaid plans airtel prepaid plans price hike 2022 says ceo Gopal Vittal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Airtelएअरटेल