९८.५ टक्के लोक इंटरनेट वापरण्यास अपात्र; गोपनीय माहिती आपण टाकतोय धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 08:36 AM2021-11-10T08:36:57+5:302021-11-10T08:37:20+5:30

सायबर तज्ज्ञ आणि गोव्याचे सुपुत्र हेरॉल्ड डिकॉस्ता यांच्याशी संवाद

98.5% of people do not have access to the Internet; Interview with cyber expert Harold DiCosta | ९८.५ टक्के लोक इंटरनेट वापरण्यास अपात्र; गोपनीय माहिती आपण टाकतोय धोक्यात

९८.५ टक्के लोक इंटरनेट वापरण्यास अपात्र; गोपनीय माहिती आपण टाकतोय धोक्यात

googlenewsNext

- वासुदेव पागी 

पणजी : मोबाईल इंटरनेट वापरणारे ९८.५ टक्के लोक हे सुरक्षाविषयक खबरदारी घेत नसल्यामुळे ते इंटरनेट वापरण्यास अपात्र आहेत. एखादे ॲप डाऊनलोड करतानाही आपली गोपनीय माहिती आपण धोक्यात टाकत आहोत याची माहिती क्वचित लोकांना असते. कारण सायबर हायजनिक प्रॅक्टिस देशात फार कमी आहे आणि गोवाही त्याला अपवाद नाही, असे स्पष्ट मत प्रसिद्ध सायबर तज्ज्ञ आणि गोव्याचे सुपुत्र हेरॉल्ड डिकॉस्ता यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.

सायबर गुन्हेगार हे तपास एजन्सीपेक्षाही चार पावले पुढे असतात? 

निश्चितच खरे आहे. कारण सायबर गुन्हेगार हा गुन्हा करून मोकळा झाल्यानंतर पोलिसांचे काम सुरू होते. तसेच जगातील कोणत्याही कोपऱ्यातून ते कुणाचीही फसवणूक करू शकतात. 

यावर काही उपाय नाही का? 

खबरदारी घेणे हाच उपाय.  सायबर हायजीन प्रॅक्टिस म्हणजेच सायबरविषयक सर्व व्यवहार हे अत्यंत सुरक्षित पद्धतीने आणि खबरदारीने करणे आवश्यक आहे. दुर्दैवाने मोबाईल इंटरनेट वापरणारे ९८.५ टक्के लोक हे सुरक्षाविषयक कोणतीही खबरदारी घेत नाहीत. त्यामुळे ते इंटरनेट वापरण्यास अपात्र आहेत.

कोट्यवधी ॲन्ड्रॉईड ॲप्स प्ले स्टोअरवर असतात. त्यात बरे काय, वाईट काय हे पाहणे सर्वांना शक्य होईलच असे नाही ना?

तीच तर खरी समस्या आहे. अलिकडेच सायबर सुरक्षेच्या विषयात देशाची नोडल एजन्सी असलेली कॉम्प्यूटर एमर्जन्सी रिस्पॉन्स टीमकडून (सर्ट) प्लेस्टोअरवरील ॲपची धोकादायकता तपासली जाणार आहे. हा एक अत्यंत आश्वासक निर्णय आहे.

खबरदारी घेणे म्हणजे काय करणे? 

अगोदर इंटरनेट, ब्राऊझर, ब्राऊझिंग, ॲप्स हे विषय समजून घेणे. या विषयात तज्ज्ञ असण्याची गरज नाही, परंतु एखादे अँड्रॉईड ॲप इन्स्टॉल करण्यापूर्वी त्या ॲपचे सर्वर्स लोकेशन कुठे आहे, कोणत्या परवानग्या ते इन्स्टॉल करण्यासाठी मागत आहेत. त्या परवानगी दिल्यास काय होऊ शकते याची माहिती करून घेण्याची आवश्यकता आहे. 
 

Web Title: 98.5% of people do not have access to the Internet; Interview with cyber expert Harold DiCosta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.