शाओमी-रियलमी नव्हे तर ‘या’ कंपनीनं सादर केला 6,000mAh Battery असलेलं फोन; किंमत आहे परवडणारी 

By सिद्धेश जाधव | Published: December 9, 2021 03:36 PM2021-12-09T15:36:36+5:302021-12-09T15:42:21+5:30

6000mah Battery Phone Tecno Pova Neo Price: टेक्नो पोवा नियो स्मार्टफोनमधील 6000mAh ची बॅटरी या फोनची खासियत आहे. नायजेरियात आलेला हा फोन लवकरच भारतीय बाजारात देखील दाखल होऊ शकतो.

6000mah battery phone Tecno Pova Neo Price Specs Sale Offer  | शाओमी-रियलमी नव्हे तर ‘या’ कंपनीनं सादर केला 6,000mAh Battery असलेलं फोन; किंमत आहे परवडणारी 

शाओमी-रियलमी नव्हे तर ‘या’ कंपनीनं सादर केला 6,000mAh Battery असलेलं फोन; किंमत आहे परवडणारी 

Next

TECNO Mobile नं बजेट सेगमेंटमधील स्पर्धा अजून रंगतदार केली आहे. कंपनीनं जागतिक बाजारात 6000mAh Battery असलेला स्मार्टफोन सादर केला आहे. इतकेच नव्हे तर Tecno Pova Neo ची किंमत देखील परवडणारी आहे. सध्या हा फोन नायजेरियामध्ये 6,000mAh battery, 13MP Camera आणि 4GB RAM सारख्या स्पेक्ससह आला आहे. तिथे याची किंमत NGN 75,100 अर्थात 13,800 रुपये ठेवण्यात आली आहे.  

Tecno Pova Neo 

Tecno Pova Neo स्मार्टफोनमध्ये प्रोसेसिंगसाठी मीडियाटेकचा चिपसेट देण्यात आला आहे. त्याचबरोबर 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज मिळते. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डनं वाढवता येते. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित हायओएस 7.6 वर चालतो. हा बेसिक कनेक्टिव्हिटीसह येणार ड्युअल सिम फोन आहे. ज्यात सिक्योरिटीसाठी रियर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. 

टेक्नो पोवा नियोमध्ये 6.8 इंचाचा लार्ज एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा पंच होल डिस्प्ले 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोटोग्राफीसाठी या नवीन टेक्नो फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात एलईडी फ्लॅश, 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि सेकंडरी सेन्सर देण्यात आला आहे. तसेच यात 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. 

पॉवर बॅकअपसाठी नवीन टेक्नो पोवा नियो फोनमध्ये 6,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे, ही या फोनची खासियत आहे. हा डिवाइस 18वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. फक्त 15 मिनिटांच्या चार्जवर हा फोन 3 तासांपर्यंतचा गेम टाइम देऊ शकतो, असा दावा टेक्नो मोबाईल कंपनीनं केला आहे.  

Web Title: 6000mah battery phone Tecno Pova Neo Price Specs Sale Offer 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.